‘शासन आपल्या दारी’ उपक्रम स्तुत्य

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम स्तुत्य

05285
महिला सन्मान बचतपत्र माहिती सादरीकरण अनुषंगाने उपस्थित प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे व पोस्ट कर्मचारी.


‘शासन आपल्या दारी’ उपक्रम स्तुत्य

प्रांताधिकारी काळूसे; मालवणात स्त्री शक्ती समाधान शिबिर

मालवण, ता. २६ : शासन आपल्या दारी हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा उपक्रम सर्वत्र राबवला जात आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजन माध्यमातून महिलांच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत समस्यांचेही निराकरण केले जात आहे. स्त्री शक्तीचा सन्मानासाठी तहसीलदार व मी आम्ही दोघीही सर्व महिलांसोबत आहोत, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी येथे केले.
शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरचे आयोजन समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी काळूसे बोलत होत्या.
दरम्यान, या उपक्रमाअंतर्गत गेल्या काही दिवसांत एकूण ४, ९५८ लाभार्थ्यांना दाखले व अन्य लाभ देण्यात आले. तर एसटी विभागाच्यावतीने सवलत तिकीट व अन्य स्वरूपात ४८ हजार जणांना लाभ देण्यात आले. अशी माहिती निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी दिली.
यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, प्रभारी महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग बी जी काटकर, डिसीओ नितीन काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामराव जाधव, एकात्मिक महिला बालविकास अधिकारी मालवण कौमुदी रसाळ-पराडकर, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार आंनद मालवणकर, निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख मालवण विनोद काळे, जि.प. बांधकाम उपविभागीय अभियंता सतिष सावर्डेकर, मोटारवाहन निरीक्षक जावेद शिकलदार, महिला सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे, सिंधुकन्या अध्यक्षा प्रिती सावंत, कृषी अधिकारी संजय गोसावी, मत्स्यव्यवसाय विभाग प्रदीप सुर्वे आदी उपस्थित होते. विविध स्टॉल उभारणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी अनेक महिलांच्या समस्या जाणून घेत त्याबाबत मार्ग सुचवले. शिबिरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, पोष्ट, एलआयसी, एमएसईबी, बीएसएनएल, मविम, भूमिअभिलेख यासह अन्य विविध कार्यालय प्रतिनिधी स्टोल उभारून उपस्थित होते. उपस्थित महिलांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच तक्रार अर्ज दाखल करून समस्या निराकरण करून घेतल्या. यावेळी विविध दाखल्यांचे वितरण, शेतकरी योजना, तसेच अन्य स्वरूपात प्रातिनिधिक सन्मान करण्यात आले.
यावेळी स्वराज्य महिला ढोलताशा पथकाचे विशेष सादरीकरण करण्यात आले. अतिशय उत्तम सादरीकरण असल्याचे कौतुकोद्गार प्रांताधिकारी काळूसे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३० रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी या कार्यक्रमात हे महिला ढोल ताशा पथक मालवण तालुक्याकडून प्रतिनिधित्व करेल, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com