पावसाळा दूर, इतक्यात जलपर्यटन बंद का?

पावसाळा दूर, इतक्यात जलपर्यटन बंद का?

05292
मालवण ः येथील भाजप कार्यालयात एकवटलेले किल्ले सिंधुदुर्ग होडी व्यावसायिक व पर्यटन व्यावसायिक.


पावसाळा दूर, इतक्यात जलपर्यटन बंद का?

मालवण व्यावसायिक; मुदतवाढीबाबत शासनाने विचार करावा

मालवण, ता. २६ : पावसाची कोणतीही स्थिती नसल्याने समुद्री वातावरण चांगले आहे; मात्र बंदर विभागाच्या ‘जलपर्यटन बंद’, या आदेशामुळे जलपर्यटन ठप्प झाले आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून जलपर्यटन सुरू होणे आवश्यक आहे. तरी शहरात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आणि जलपर्यटनासाठी आवश्यक असणारी मुदतवाढ देण्याबाबत शासनस्तरावर लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पर्यटन व्यावसायिकांच्यावतीने भाजप कार्यालयातून माजी खासदार नीलेश राणे यांचे दूरध्वनीवरून लक्ष वेधले. दरम्यान, नीलेश राणे यांनी जलपर्यटनाला मुदतवाढ मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
जलक्रीडा व होडी वाहतूक बंदबाबत बंदर विभागाने अंमलबजावणी सुरू केल्याने किल्ला होडी सेवा संघटना तसेच पर्यटन व्यावसायिक यांनी आज भाजप कार्यालयात येवून भाजप पदाधिकारी यांची भेट घेतली. जलपर्यटनाला मुदतवाढ मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पर्यटन व्यावसायिक तसेच किल्ला होडी वाहतूक व्यवसायिक मंगेश सावंत, दिलीप आचरेकर, प्रसाद सरकारे, मनोज आढाव, हेमंत आचरेकर, जॉनी फर्नांडिस, चंदू सरकारे, अंतोन डिसोजा, संतोष सकपाळ, जयश्री सकपाळ, दिपाली कालमेतर तसेच अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरीटाईम बोर्डाच्या नियमावलीनुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रात होणारी जलवाहतूक व जलक्रीडा यांना दरवर्षी २६ मे पासून ३१ ऑगस्ट पर्यत बंदी करण्यात येते. मात्र अद्याप पावसाळी वातावरण नसल्याने तसेच सुट्टी कालावधी असल्याने पर्यटकांचा ओघ जास्त आहे. मात्र जलक्रीडा व किल्ला वाहतूक बंद असल्याने पर्यटक माघारी फिरत असून पर्यटनावर परिणाम होत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन यापूर्वी काहीवेळा मेरिटाईम बोर्ड व स्थानिक बंदर विभाग यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्याधर्तीवर मुदतवाढ मिळावी यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनने किल्ला प्रवासी वाहतुकीस ३१ मे पर्यंतची वाढ मिळावी अशी मागणी केली आहे.
---
मेरिटाईम बोर्डाशी संपर्क
माजी खासदार नीलेश राणे यांनी संघटनेच्या मागणीनुसार मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यापूर्वी बंदर विभागकडून सन २०१६ मध्ये मुदतवाढ दिली होती. त्याधर्तीवर वातावरण व सुरक्षेचा आढावा, हवामान खात्याचा अंदाज घेऊन मुदतवाढ मिळावी, अशी भूमिका मांडली आहे. पर्यटन व्यावसायिक व होडी वाहतूक या सर्वांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी नीलेश राणे शासनस्तरावर पाठपुरावा करत असल्याचे सुदेश आचरेकर, बाबा परब, विजय केनवडेकर, बाबा मोंडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com