महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण 
समितीच्या सदस्यपदी गावडे

महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण समितीच्या सदस्यपदी गावडे

05339
भरत गावडे

महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण
समितीच्या सदस्यपदी गावडे
सावंतवाडी, ता. २७ ः महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण समितीच्या सदस्यपदी भरत सडक गावडे यांची निवड करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष असून या विभागाचे प्रधान सचिव सहअध्यक्ष, तर शिक्षण आयुक्त उपाध्यक्ष आहेत.
ही समिती राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस, मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे सनियंत्रण व सुसूत्रीकरण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबावणीसह शासनाच्या विविध संस्थांमध्ये सुयोग्य, समन्वयाने समित्या व उपसमित्या तयार करून त्यातील सदस्यांना मार्गदर्शन व शिफारसी करण्याचे कामही ही समिती करणार आहे. गावडे यांनी ३३ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविले. मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गेली २० वर्षे ते राज्य, विभाग व जिल्हास्तरावर कार्यरत आहेत. निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी या दोन्ही प्रशिक्षणासाठी त्यांनी कोकण विभाग व जिल्हास्तरावर काम केले. एक उपक्रमशील शिक्षक आणि मराठी विषयाची तळमळ या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. निवृत्तीनंतरही ते शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी आहेत. दाणोली येथील साटम महाराज वाचनालयाचे ते अध्यक्ष, कोमसापचे जिल्हा कोषाध्यक्ष, ‘आरती’ मासिकाचे सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे ते कार्याध्यक्ष असून कोकण ग्रंथालय संघाचे सदस्यही आहेत. त्यांच्या या शैक्षणिक, साहित्य, ग्रंथालय क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने त्यांची राज्यस्तरीय समितीवर निवड केली आहे. या निवडीबद्दल गावडे यांचे शिक्षणमंत्री केसरकर, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com