चिखलीत नाला रूंदीकरण, गाळ उपसा प्रारंभ

चिखलीत नाला रूंदीकरण, गाळ उपसा प्रारंभ

rat२७p२.Jpg
०५३२८
गुहागरः उपक्रमात सहभागी झालेले अधिकारी, ग्रामस्थ.

चिखलीत नाला रूंदीकरण, गाळ उपसा प्रारंभ
गुहागर, ता.२८ः तालुक्यातील चिखली कदमवाडी ते साळवीवाडी या दरम्यानच्या नाला रूंदीकरण व गाळ उपसा या कामाचा आरंभ नुकताच करण्यात आला. लोकसहभागातून सुरू झालेल्या या उपक्रमाला नाम फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. चिखली येथे नाला रूंदीकरणाचे काम बरीच वर्षे प्रस्तावित होते. तसेच मोठ्या प्रमाणात गाळ भरला होता. खर्चिक बाब असल्याने या कामाला थोडा विलंब झाला होता. अखेर या कामाचे नियोजन करण्यात येऊन लोकसहभागातून या कामाला सुरवात झाली. हा उपक्रम राबवण्यासाठी २०२१ पासून तुळसीदास साळवी व विजय भाऊ साळवी यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. या कार्यक्रमाला नाम फाउंडेशनचे कोकण विभागप्रमुख समीर जानवळकर, टीडब्ल्यू जे. फाउंडेशनचे पोमेंडकर, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, पी. एम. गवारी, गुहागर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे उपस्थित होते.

------------
rat२७p३.jpg
०५३२९
गुहागरः व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी.

मुंढर विद्यामंदिरमध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
गुहागर ः मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्या गुहागर तालुक्यातील मुंढर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. विवेक नातू यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शक म्हणून सुरेंद्र वैद्य, सचिन विचारे संतोष अरमारे यांनी मार्गदर्शन केले. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टी असते. त्यामुळे दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २४ ते २८ एप्रिलपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्गदर्शकांनी दिली. आमच्याकडे अशी एक बॅच आहे त्यातील ४० विद्यार्थ्यांना प्लंबिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम, फिटिंग, स्प्रे पेंटिंग आदी शिकण्याची संधी संस्थेने उपलब्ध केली आहे. या आठवड्यात ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून सहभागाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
----------------
बारावी बोर्ड परीक्षेत गावतळे कॉलेजचा ९५.४५ टक्के निकाल
गावतळे ः दापोली तालुक्यातील श्रीमान मथूरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनि. कॉलेज गावतळेने बारावी बोर्ड परीक्षेत ९५.४५ टक्के निकाल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम क्र. अंजली खळे (७९.८३ टक्के) द्वितीय मंदार जाधव (७९.६७), तृतीय दिया कोळंबे (७२.३३). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य ए. आर. नलावडे व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी, पंचक्रोशी स्कूल कमिटीचे अध्यक्ष एन. वाय. पवार, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
---------------
महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल ८८ टक्के
साखरपाः येथील रयत शिक्षणसंस्थेच्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८८ टक्के लागला असून, एमसीव्हीसी विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. अभिषेक दळवी याने ७५ टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. आकाश बाईंग, अवधूत वेल्हाळ आणि अलफिया रमदुल यांनी अनुक्रमे ६६.५ टक्के, ५८ टक्के आणि ५७ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७२ टक्के लागला आहे. संयुक्त शाखेतून देवयानी लिंगायत ६८ टक्के, वैष्णवी गार्डी ६६.१७ टक्के आणि उषक कांबळे ६६.५० टक्के गुण मिळवत प्रथम द्वितीय आणि तृतीय आले आहेत. एमसीव्हीसी वीभागातून अभिषेक दळवी ७५ टक्के, इशा घुमे ७१.३३ टक्के तर ज्योती कोलापटे ६४.१७ टक्के गुण मिळवत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com