शिवसेना-भाजपकडून विकासकामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना-भाजपकडून विकासकामांना वेग
शिवसेना-भाजपकडून विकासकामांना वेग

शिवसेना-भाजपकडून विकासकामांना वेग

sakal_logo
By

05417
निगुडे ः येथे रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी बबन राणे व अन्य.


शिवसेना-भाजपकडून विकासकामांना वेग

बबन राणे; निगुडे-गावठाणवाडी रस्त्याचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः निगुडे गावासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. गावात अनेक विकासकामे शिवसेना-भाजपच्या माध्यमातून करण्यात येतील. जी कामे प्रलंबित आहेत, ती तातडीने पूर्ण करू, अशी ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी दिली.
निगुडे-गावठाणवाडी रस्ता गेले अनेक वर्षे खड्डेमय होता. माजी सरपंच समीर गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत या रस्त्यासाठी निधीची मागणी केली. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून रस्ता मंजूर केला. हा रस्ता आज नागरिकांसाठी खुला करण्यात आला. श्रीफळ फोडून या रस्त्याचे उद्‍घाटन तालुकाप्रमुख राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राणे म्हणाले, ‘‘उर्वरित रस्ता मंजूर असून त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल. शिक्षणमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून निगुडे-सोनुर्ली मुख्य रस्ता, निगुडे कासकरटेंब असे अनेक रस्ते यावर्षी पूर्णत्त्वास आले आहेत. निगुडे माजी सरपंच गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला. आम्हीही ते कुठच्या पक्षाचे आहेत हे न बघता शिवसेना-भाजच्या माध्यमातून रस्त्यासाठी प्रयत्न केले. सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास शक्य झाला.’’
निगुडेचे माजी सरपंच गावडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपसरपंच गवंडे यांनी आभार मानले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सिद्धिविनायक गावडे, शिवसेना विभाग प्रमुख राजन परब, निगुडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, साक्षी गावडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मयेकर, गौरेश गावडे, प्रकाश मयेकर, विलास सावंत, सुहास गावडे, राजन निगुडकर, प्रदीप मयेकर, दादू म्हाडगुत, साहिल आंबेकर, पलक मयेकर, गौरवी गावडे, खुशी गवंडे आदी उपस्थित होते.