मंडणगड - वडवली गावाने दिला निरोगी आरोग्याचा मंत्र

मंडणगड - वडवली गावाने दिला निरोगी आरोग्याचा मंत्र

Rat२८p२२.jpg
०५५६०
विश्राम म्हाब्दी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना वडवलीकर ग्रामस्थ, महिला.
-Rat२८p२३jpg ः
०५५६१
माहेरवाशिणींना कलम वृक्षाचे वाटप करताना.
-------------------
वडवलीने दिला निरोगी आरोग्याचा मंत्र
महाआरोग्य शिबिराचे आयोजन; औषधे वाटप; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मंडणगड, ता. २९ ः तालुक्यातील वडवली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, वडवली उत्कर्ष समितीतर्फे दोन दिवसांचे मोफत महाआरोग्य शिबिरासह मार्गदर्शन व विविध कार्यक्रम उत्साहात झाले. वडवलीकरांनी परिसरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा मंत्र देत स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबवला.
शाळेच्या प्रांगणात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देविदास चरके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. १५० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. बालसंगोपन, स्त्रियांचे आरोग्य यावर डॉ. जाधव, डॉ. ज्योती वडजकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी संपूर्ण तालुका आरोग्य विभाग व डॉ. पुरुषोत्तम शिंदे, डॉ. सुहास पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. यानिमित्ताने सत्यनारायण महापुजा झाली. या वेळी नियोजनानुसार पुष्पगुच्छ, वृक्ष या स्वरूपात सत्कार करण्यात आले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश समाजाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले देणगीदारांचे आभार आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले. ग्रामदेवतेच्या मूर्ती बनवण्यासाठी ज्यांनी योगदान दिले तसेच मंडळाच्या इतर सण-उत्सवांना ज्यांनी सढळ हाताने मदत केली त्या सर्व देगीदारांनाही सन्मानित करण्यात आले. हळदीकुंकू समारंभात सर्व माहेरवाशिणींना कलम वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. वडवली गावात रस्ता आणणे, नळपाणी योजना राबवणे, शाळेची दिमाखदार वास्तू उभारणे यांसारख्या अनेकांगी कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणारे वडवली गावाला लाभलेले प्रगल्भ नेतृत्व विश्राम म्हाब्दी यांना जीवनगौरव पुरस्काने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम बहुरंगी नमनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com