संक्षिप्त

संक्षिप्त

टुडे पान २ साठी, संक्षिप्त

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर रमजान गोलंदाज
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रमजान गोलंदाज यांची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्यात काम करत असणारे गोलंदाज यानी तळागाळातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम होते. त्यांची नाही सामाजिक कामातून अनेक लोकांशी जोडली गेली असून इतरांची समस्या ही स्वतःची समस्या समजून त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. परिसरातील अनेक विषय त्यांनी मार्गी लावले.

गटारातील सांडपाणी हौसिंग सोसायटीत
दाभोळ : दापोली शहरातील हर्णै मार्गावर असलेल्या मेहेंदळे आश्रम येथील रस्त्यावर गटाराचे काम मागील २ वर्षांपासून मंजूर आहे. ते अद्याप पूर्ण न केल्याने त्या गटारातील सांडपाणी समोरच असलेल्या हौसिंग सोसायटीच्या आवारात जाते. तेथे दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार दापोली नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची महिती या संस्थेच्या अध्यक्षांनी दिली आहे. या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने दरवर्षी पावसाळ्यात या गटारातून जाणारे सांडपाणी बाहेर येते व ते या सोसायटीच्या आवारात जात असल्याने तेथील सदस्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष तसेच अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियन्ता यांना वस्तुस्थिती दाखवूनही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाहीत तसेच या गटारातील गाळही काढला जात नसल्याची माहिती या संस्थेच्या अध्यक्षांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचे पाणी या गटारातून बाहेर पडून सर्वत्र दुर्गंधी पसरली होती, येत्या पावसात अशीच परिस्थती उद्भवणार असून नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेल्यास आंदोलनाचा मार्ग नाईलाजाने अवलंबावा लागेल असा इशाराही एका पत्राद्वारे या सोसायटीच्या अध्यक्षांनी दिला आहे.


मुख्य रस्त्यावर गव्याचा वावर
दाभोळ : दापोली तालुक्यातील सारंग मार्गावर गवा रेडा मुख्य रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याआधी देखील वणंद बांधतिवरे मार्गावर गव्याचे दर्शन अनेकांना झालेले आहे. त्यात पुन्हा एकदा सारंग येथे गवा रेडा मुख्य मार्गावर आला होता. जरी गवा रेडा एका बाजूला उभा असला तरी त्याच्या पुढयातून कोणीही गाडी नेण्यास तयार नसल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे तो रस्त्यातून बाजूला जाईपर्यंत वाहन चालकांना वाट पाहावी लागली.

देशातील पूर्वांचल भागावर
विनय जोशींनी दिली माहिती
दाभोळ ः दापोली येथील राष्ट्रसेविका समितीच्यावतीने व्याख्यानमाला पुष्प ११ वे हा कार्यक्रम जालगाव येथील केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये व्याख्याते विनय जोशी यांनी देशातील पूर्वांचल या भागावर माहिती दिली. सुवर्णा जोशी यांनी गीत सादर केले. मनश्री भिडे यांनी प्रार्थना तर गौरी खोत यांनी वंदे मातरम् म्हटले तर अस्मी जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दापोली शाखेच्या तालुकाप्रमुख मंजुषा वैद्य, जिल्हा बौद्धिकप्रमुख डॉ. प्रविणा दांडेकर, प्रा. अशोक देशमुख, डॉ. शिवप्रसाद दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com