रत्नागिरी- वाईट शक्तींचा करेक्ट कार्यक्रम करणार

रत्नागिरी- वाईट शक्तींचा करेक्ट कार्यक्रम करणार

rat28p14.jpg
M05540
रत्नागिरी : सावरकर जयंती कार्यक्रमाप्रसंगी रविवारी पतितपावन मंदिरात बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत मंत्री मंगलप्रभात लोढा, अॅड. दीपक पटवर्धन आदी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------
वाईट शक्तींचा करेक्ट कार्यक्रम करणार
उदय सामंत ; इतिहास न वाचणाऱ्यांनी सावरकरांचे नाव घेणे निषेधार्थ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वाट्टेल त्या पद्धतीने, खालच्या स्तरावरून टीका केली गेली. ज्यांना स्वातंत्र्यवीर कळले नाहीत, त्यांचा इतिहास कधी वाचला नाही त्यांनी सावरकरांचे नावसुद्धा घेणे निषेधार्थ आहे. रत्नागिरीतही सोशल मीडियावरून चांगल्या कामाची बदनामी करत चुकीचे संदेश व्हायरल करणाऱ्या शक्तींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांनी तंबी दिली. अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर त्या वाढतात, असेही ते म्हणाले. पतितपावन मंदिरात वीर सावरकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची पहिली आरती वीर सावरकरांनी लिहीली. हा इतिहास लोक विसरू लागले आहेत. त्या सावरकरांची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला, याबद्दल अभिनंदन. दहा महिन्यांपूर्वी राजकीय बदल झाला आणि शिंदे- फडणवीस सरकाराने इतिहासात प्रथमच २८ मे सावरकरांची जयंती हा सावरकर गौरव दिन म्हणून साजरा होत आहे. पुढच्या पिढीला सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो त्यांचा करेक्ट करण्याचे काम केले पाहिजे. मी करेक्ट हा शब्द वापरला कारण देशात सावरकरांच्या बदनामीची मोहीम आखली जात आहे. पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट असो आमच्यात कधी तंटा होत नाही. रत्नागिरीकर सावरकरांच्या विचाराने प्रेरित असल्यामुळे देशाबद्दलचे प्रेम व्यक्त होते. हा उत्सव ३६५ दिवस झाला पाहिजे. सावरकरांचा विचार राज्यात पोहोचला पाहिजे याकरिता मोहीम उघडण्याची गरज आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो. आम्ही काही लोकांना आवाहन केले व त्यामुळे मधुसूदन कालेलकर लिखित ''सागरा प्राण तळमळला'' हे नाटक ३ जूनपासून महाराष्ट्रात दाखवले जाणार आहे. वि. दा. सावरकर स्मारक मुंबईत झाले व वीस वर्षांपूर्वी सावरकर नाट्यगृह रत्नागिरीत झाले. त्या वेळी नामकरणाचे धाडस उमेश शेट्ये यांनी केले. आज ते हयात नाहीत. पण त्यांचे नाव घेतले पाहिजे.

चौकट
.. त्यांना राहुल गांधींकडे पाठवूया
आपण सोशल मिडीयाचा फार मोठा विचार करायला लागलो आहोत. एका विद्वानाने गोडबोले नगरच्या शाळेजवळ वेगळ्या धर्माचे काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे काम महाराष्ट्र शासनातर्फे केले जात आहे. त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले, किती नतद्रष्ट आहेत हे. त्याचे नाव मला माहिती आहे, कोण आहे तेही माहित आहे, असे सांगून खुलासा करताना सामंत म्हणाले की, विद्यालयात अशी कोणतीही वास्तू होणार नाही, की शरमेने मान खाली घालावी लागेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशी कुठची शक्ती आहे जी सावरकरांच्या विचारांना धक्का देत आहे. आपण ही शक्ती शोधली पाहिजे. ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. चांगल्या कामाला बदनाम केले जाते. राहुल गांधीचे भाऊबंध असावेत. पण ते जर आपल्यात असतील तर त्यांना राहुल गांधींकडे पाठवूया, आपण अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केले तर त्या वाढतात. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सोशल मीडियावरून चुकीचे संदेश व्हायरल केले जात आहे. रत्नागिरीच्या विकासाच्याकरिता क्रांतीकारी विचाराने, सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही सामंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com