खेड बसस्थानकातून महिलेचे 4 लाखाचे दागिने लंपास

खेड बसस्थानकातून महिलेचे 4 लाखाचे दागिने लंपास

पान ३ साठी)

खेड बसस्थानकातून
चार लाखांचे दागिने पळविले
खेड, ता. २८ ः बसस्थानकातून सुटणाऱ्या खेड-बोरिवली एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत एका महिलेच्या पर्समधील ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अश्विनी आत्माराम शिबे (रा. दहिसर मुंबई मूळगाव, उधळे-शिबेवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अश्विनी या मुलीसह मुंबईला जाण्यासाठी येथील बसस्थानकात आल्या होत्या. या येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या खेड-बोरवली बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत एका अज्ञात महिलेने याबाबत अश्विनी त्यांच्या पर्समधील ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने लांबवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गर्दीचा फायदा उठवत दागिने लंपास करण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. खेड बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसमधूनही दागिने लांबवण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com