शेतकरी सक्षमीकरणात पुढाकार घ्या

शेतकरी सक्षमीकरणात पुढाकार घ्या

05598
बांदा ः विकास सोसायटी सभागृहाच्या उद्‍घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

शेतकरी सक्षमीकरणात पुढाकार घ्या

मनीष दळवी; बांदा सहकार संस्थेच्या सभागृहाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः विकास संस्था गावाच्या प्रगतीचा मुख्य पाया आहेत. संस्थांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा बँक पूर्णपणे साथ देईल. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संस्था मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता एवढे मोठे सभागृह बांधणारी ही एकमेव संस्था आहे. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी बांदावासीयांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे केले.
येथील बांदा ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा मंडळ, बांदा या संस्थेच्या सहकार कृषी भवन व सभागृहाचे उद्‍घाटन दळवी यांच्या हस्ते आज झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक रवींद्र मडगावकर, श्रीपाद अळवणी, एस. आर. सावंत, गजानन गायतोंडे, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, संस्थेचे चेअरमन घनःश्याम धुरी, भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी, बांदा विकास संस्थेचे उपाध्यक्ष बाळू सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी सभागृहाचे काम विनामोबदला करून दिल्याबद्दल अभियंता राजाराम उर्फ बाळू सावंत यांचा दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभागृहाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपाध्यक्ष काळसेकर, संचालक मडगावकर, कामत, सरपंच नाईक, चेअरमन बांदेकर, अळवणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाळा आकेरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बाळू सावंत यांनी प्रास्ताविक केले. संजय चांदेकर यांनी आभार मानले.
--
विविध कार्यक्रम हाती घेणे गरजेचे
दळवी पुढे म्हणाले, ‘‘बांदा विकास संस्थेच्या मेहनतीचे फळ या सभागृहातून दिसते. यापुढे संस्थांना व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी संस्थांनी झटून काम केले पाहिजे. शेतमाल खरेदी करणे आदींसह विविध कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा बँक नेहमी तुमच्या सोबत राहील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com