विकासासाठी निकोप स्पर्धा हवीच

विकासासाठी निकोप स्पर्धा हवीच

swt291.jpg
05656
कुडाळ ः उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना पंचायत समितीच्यावतीने निरोप देताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण, विशाल तनपुरे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

विकासासाठी निकोप स्पर्धा हवीच
राजेंद्र पराडकरः कुडाळात प्रशासकीय संस्कार शिबिराची सांगता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ः जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा होती; मात्र वैयक्तिक वाद कधीही नव्हता. माझे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे मित्रत्वांचे नाते असून ते कायम राहील, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी कुडाळ येथे प्रशासकीय संस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रमात केले. यावेळी पराडकर हे बुधवारी (ता. ३१) सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना पंचायत समितीच्यावतीने निरोप देण्यात आला.
कुडाळ पंचायत समितीच्यावतीने प्रशासक तथा गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला ''व्हर्च्युअल क्लासरूम''चे उद्घाटन पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, डॉ. संदेश कांबळे, एकात्मिक बालविकास अधिकारी सौ. पाटकर, डॉ. संदेश कांबळे आदींसह पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता
यावेळी पराडकर म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाचे यशवंतराज निर्मलग्राम हागणदारीमुक्त योजनेमध्ये खूप स्पर्धा झाल्या. या स्पर्धा निकोप असल्या तरी प्रत्येक तालुका पुढे येणे गरजेचे होते. हागणदारीमुक्तमध्ये देवगड व मालवण तालुक्यांत मी व गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा असायची; मात्र यातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत होता. सुरुवातीला स्पर्धेत आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळविले. त्यानंतर स्पर्धा होताना चव्हाण यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे आम्ही स्पर्धेत टिकू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. देवगड-मालवणला एकदा एक नंबर मिळाला, त्यानंतर मात्र कुडाळ पंचायत समितीने आपले वर्चस्व सर्वच स्पर्धांमध्ये कायमस्वरूपी राखले. एकूणच आमच्यामध्ये विकासासाठी स्पर्धा होती, दोघांमध्ये कोणताही वाद कधीच नव्हता. ३१ मे रोजी मी सेवानिवृत्त होत आहे. मला पंचायत समितीच्यावतीने निरोप देण्यात येणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसताना माझ्यासाठी आश्चर्यकारक समारंभ असल्याचे स्पष्ट केल्याने मी भारावून गेलो."
तनपुरे यांनी सुद्धा पंचायत समितीच्या नियोजनबद्ध उपक्रमाबाबत कौतुक केले. सर्व स्पर्धांमध्ये कुडाळ तालुका नेहमीच अग्रेसर राहिला व प्रशासकीय संस्कार शिबिर हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी झाला, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तावित अमित तेंडुलकर यांनी केले. आभार सौ. पाटकर यांनी मानले.
............
चौकट
पराडकर माझे प्रशासकतेतील गुरू
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांचे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान आहे. त्यांनी शासनाच्या विविध योजनांत वेगवान प्रगती केली आहे. प्रशासकेतील ते माझे गुरु, सखा, सोबती असून मी त्यांचा शिष्य आहे. लवकरच ते सेवानिवृत्त होत असून त्यांची उणीव आम्हाला निश्चितच जाणवणार आहे. यानिमित्त कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून एक लाख 59 हजार जनतेच्यावतीने आम्ही सन्मानपत्र बहाल करीत असल्याचे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्त गुरुनाथ माने, पशु विभागाचे एम. बी. भोई यांना पंचायत समितीच्यावतीने निरोप देण्यात आला.
.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com