‘राष्ट्रवादी’च्या वर्धापनदिनी विविध उपक्रम

‘राष्ट्रवादी’च्या वर्धापनदिनी विविध उपक्रम

05930
वेंगुर्ले ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत उपस्थित तालुकाध्यक्ष योगेश कुबल, सत्यवान साटेलकर, नम्रता कुबल, प्रज्ञा परब, डॉ. संजीव लिंगवत, धर्माजी बागकर व इतर पदाधिकारी.


‘राष्ट्रवादी’च्या वर्धापनदिनी विविध उपक्रम

वेंगुर्लेत नियोजन; विद्यार्थी गौरवासह वृक्षारोपणाचा समावेश

वेंगुर्ले, ता. ३० ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणाची जबाबदारी देण्याबाबत ठरविण्यात आले. तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच पक्षाच्यावतीने विविध उपक्रम तालुक्यात व शहरात राबविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ठरविण्यात आले.
वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण व शहर कार्यकारिणीची एकत्रित बैठक हॉस्पिटल नाका येथील पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष योगेश कुबल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीला नवनियुक्त तालुकाध्यक्ष योगेश कुबल यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, जिल्हा बॅंक संचालिका प्रज्ञा परब, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, तालुका महिला अध्यक्षा दीपिका राणे, माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, वैभव वाडकर, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, सुप्रिया परब, भिवा बिडये, अपूर्वा परब, प्रदीप पडवळ, विशाल बागायतकर, रामेश्वरी गवंडे, राजू गवंडे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनाच्या कार्यक्रमामध्ये दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे असलेल्या ठिकाणावरून हलवून अवहेलना केल्याबद्दल तसेच महिला खेळाडूंना दिल्लीत संसद भवनाच्या उद्‍घाटनदिनी हिन वागणूक दिल्याचा आरोप करत राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी झालेल्या संघटनात्मक चर्चेत तालुका व शहर भागातील बूथ कमिट्या मजबूत करून विभागीय कमिट्या स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तालुकाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झाल्याने येत्या जून अखेरपर्यंत पूर्ण तालुक्यात संपर्क अभियान राबवून नवीन तालुका कार्यकारिणी करण्याचे ठरविण्यात आले. ग्रामीण व शहर कार्यकारिणीच्या बैठका दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com