रत्नागिरी ः चंद्रावर उतरण्याचा अन् अंतराळ फिरण्याचा अनुभव

रत्नागिरी ः चंद्रावर उतरण्याचा अन् अंतराळ फिरण्याचा अनुभव

फोटो ओळी
- rat३०p३०.jpg ः KOP२३M०५९३४ रत्नागिरी ः अंतराळवीर टेरी विलकट यांच्यासह रत्नागिरीतील विद्यार्थी.
- rat३०p३१.jpg- KOP२३M०५९३५ रॉकेटची प्रतिकृती पाहणारे विद्यार्थी.
--------------

चंद्रावर उतरण्याचा अन् अंतराळ फिरण्याचा अनुभव
--
विद्यार्थ्यांची नासा भेट ; दुसरा दिवस अविस्मरणीय
रत्नागिरी, ता. ३० ः रॉकेटमध्ये बसून चंद्रावर उतरण्याचा आणि अंतराळात फिरण्याचा अनुभव अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राला भेट देणार्‍या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ९ विद्यार्थ्यांनी घेतला. अंतराळात जाऊन आलेले टेरी विलकट यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांची स्वाक्षरी विद्यार्थ्यांनी घेतली. संशोधन केंद्रातील दुसरा दिवस अविस्मरणीय ठरल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद शाळांतील ९ विद्यार्थ्यांसह चार अधिकारी अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्यासाठी गेले आहेत. ६ जूनपर्यंत विविध अभ्यासपूर्ण अशी ठिकाणे ते पाहणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती जागृत व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून यावर कार्यवाही करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रातील माहिती, नवनवीन प्रयोग यासह विविध माहितीचा अनमोल ठेवा भविष्यातील करिअरसाठी या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. दुसर्‍या दिवशी अंतराळवीर टेरी विलकट यांचे व्याख्यान मुलांनी ऐकले. अंतराळातील गमतीजमतीही त्यांनी सांगितल्या. टेरी हे सर्वात ज्येष्ठ अंतराळवीर आहेत. हे व्याख्यान ऐकणार्‍यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावर टेरी यांची सहीही विद्यार्थ्यांनी घेतली.
रॉकेटमधून अंतराळात जातानाचा अनुभव घेण्यासाठी मशिन्स (सिम्युलेटरर्स्) ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये सहा मिनिटे विद्यार्थ्यांना बसवण्यात आले. चंद्र, मंगळ येथे उतरताना कसे वाटते, हे विद्यार्थ्यांनी अनुभवले. रॉकेट हवेत झेपावल्यानंतर बसणारे हादरे, चंद्रावर उतरतानाचे वातावरण कसे असेल हे पाहता आले. त्याचबरोबर अंतराळत गेल्यानंतर चंद्र, तारे, खड्डे हे पाहता आले. तारांगणाप्रमाणेच नासामध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रॉकेटमध्ये बसल्यानंतर कसे वाटते याची उत्सुकता होतीच, ती नासामध्ये गेल्यानंतर पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
नासाभेटीत प्रभुती घागरूम, धनश्री जाधव, वेदांत मोरे, अभय भुवड, सोनाली डिंगणकर, आरोही सावंत, वेदांत सनये, आशिष गोबरे, भूषण धावडे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव आणि महिला वैद्यकीय अधिकारी या दौर्‍यात आहेत.
---
कोट
सलग दोन दिवस नासामधील विविध गोष्टी विद्यार्थ्यांनी पाहिल्या. सिम्युलेटरद्वारे अंतराळात फिरण्याचा आनंद त्यांना घेता आला. येथे मिळणारी माहिती नक्कीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.
- संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com