
संस्कृत विषयात श्रीराम बाक्रे राज्यात प्रथम
05958
श्रीराम बाक्रे
संस्कृत विषयात श्रीराम बाक्रे राज्यात प्रथम
कणकवली,ता. ३० ः बारावीच्या परीक्षेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी श्रीराम श्रीकांत बाक्रे याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. श्रीरामने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याने दहावीच्या शालांत परीक्षेतही संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला होता.
एम.एम.सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि तु.शि.सावंत कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदा ही शंभर टक्के लागला. आता श्रीरामच्या या यशामुळे त्यात आता विशेष भर पडली आहे. कोणत्याही भाषा विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणे अतिशय अवघड गोष्ट असते; मात्र श्रीकांतने मोठे यश प्राप्त केले आहे. दरम्यान, संस्थाध्यक्ष सतीश सावंत आदींनी त्याचे अभिनंदन केले.संस्कृत अध्यापक मकरंद आपटे यांचे श्रीरामला मार्गदर्शन लाभले.