पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण करणार

पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण करणार

ratchl303.jpg
05925
चिपळूणः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण.
------------
पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण होणार
बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती; महामार्गाच्या कामाची पाहणी
चिपळूण, ता. ३०ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. सातत्याने महामार्गाच्या कामाचा आढावा घेत आहोत. पावसाळ्यापूर्वी एकेरी मार्ग पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर संपूर्ण महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळुणात पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. रत्नागिरी तसेच संगमेश्वरहून महामार्गाची पाहणी करत चिपळुणात दुपारी दोन वाजता येणार होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, काही कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन देण्यासाठी दुपारपासूनच थांबले होते; परंतु पाहणीत विलंब झाल्याने मंत्र्यांचा ताफा सव्वापाचच्या सुमारास कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचला. मंत्र्यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारली. पाच मिनिटात मंत्र्यांचा ताफा पुढे परशुराम घाटातील पाहणीसाठी निघाला. मंत्री चव्हाण यांनी कापसाळ शासकीय विश्रामगृहात अगदी थोडक्यात संवाद साधला. ते म्हणाले, महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील किमान एक लेन सुरू होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत तर संपूर्ण महामार्ग डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी थोडक्यात बोलून पत्रकारांच्या इतर प्रश्नांवर बोलणे टाळले. त्यानंतर परशुराम घाटाच्या महामार्ग कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष केदार साठे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, रामदास राणे, वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, रसिका देवळेकर, प्रतिज्ञा कांबळी, संदीप सुखदरे, खेर्डीचे उपसरपंच विनोद भुरण, सदस्य शुभम खताते, संतोष मालप आदी उपस्थित होते.

चौकट
ठेकेदारच गैरहजर
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या कामाची वाट लावणाऱ्या ठेकेदाराचा पत्रकारांच्या समोरच जाहीर सत्कार करण्याचे नियोजन होते. त्यानुसार संबंधित ठेकेदार बोलावण्याची सूचनाही केली होती. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तो ठेकेदार तेथे उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हा आदर्श ठेकेदार नेमका कोण याची चर्चा खुमासदारपणे सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com