चिपळूण-चिपळूण आगाराचे वेळापत्रक कोलमडले

चिपळूण-चिपळूण आगाराचे वेळापत्रक कोलमडले

पान 2 साठी


-rat31p7.jpg ः

चिपळूण आगाराचे वेळापत्रक कोलमडले
चाकरमानी परतीच्या वाटेवर; प्रवाशांचे हाल
चिपळूण, ता. ३१ ः चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू असतानाच चिपळूण आगारातील एसटीचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. नियोजित फेऱ्या अर्ध्या ते तासाभराच्या फरकाने उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे एस‍टी व्यवस्थापनाने एस‍टीच्या फेऱ्या वेळेनुसार सुरू राहतील याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगार हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आगारातून ग्रामीणसह मुंबई, पुणे घाटमाथ्यावर बसफेऱ्या धावत असल्याने कायमच या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. मे महिना हा सुटी व लग्नसराईचा हंगाम असल्याने साहजिकच मुंबई, पुण्याकडे असणारे बहुसंख्य चाकरमानी गावच्या दिशेने दाखल झाले होते. विशेष म्हणजे मे महिन्याच्या प्रारंभी चाकरमान्यांचे आगमन झाल्यानंतर आणि शासनाने महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने गावी जाण्याकरिता ग्रामीण फेऱ्या चाकरमानी तसेच स्थानिक प्रवाशांनी तुडुंब भरून जात होत्या.
सद्यःस्थितीत सुटीचा हंगाम संपला असून चाकरमानी पुन्हा कर्मभूमीकडे निघाले आहेत. यावेळी मुंबई, पुणे मार्गावरील एसटी फेऱ्या फुल्ल होऊन जात असल्या तरी तासाभराच्या फरकाने उशिरा धावत असल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत. याशिवाय ग्रामीण फेऱ्या विलंबाने सुटत असल्याने एकूणच आगाराचे वेळापत्रक लक्षात घेता चांगलाच बट्ट्याबोळ उडाला असल्याचे चित्र आहे.
एकीकडे आगारात प्रवासी भारमान वाढले असल्याने अशा स्थितीत प्रवाशांना बसण्यासाठीदेखील अपुरी सुविधा असून, कमालीच्या उष्म्यात प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. मुळातच आगारात एस‍टी बसगाड्यांची संख्या कमी असून, त्या वाढवण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर त्याची कल्पना देण्यात आली आहे; मात्र त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसल्याने आहे त्याच बसगाड्यांवर आगाराचा कारभार सुरू आहे. अशा परिस्थितीत ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना प्रवासी सेवा देण्यासाठी आगार प्रशासन कटिबद्ध असले तरी अपुऱ्या बसगाड्यांमुळे बसस्थानकाचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com