संक्षिप्त

संक्षिप्त

पान २
फोटो येण

-rat31p3.jpg ः

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कीटकनाशक फवारणी मशिनचे वितरण
रत्नागिरी ः शासन आपल्या दारी अभियानांतर्गत रत्नागिरी भारत नर्सरीचे मालक भारत सावंत यांना कीटकनाशक फवारणीचे मशिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, बंदर व विकासमंत्री दादा भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, कृषी अधिकारी मराठे, बापट आणि मान्यवर उपस्थित होते.

पेढांबकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
चिपळूण ः पेढांबे भराडेवाडी येथील एकता पेढांबकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक चळवळीत सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य केल्याबद्दल पेढांबे ग्रामपंचायत येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी उपसरपंच राजेंद्र कदम, माजी सरपंच पूर्वी जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश शिंदे, सदस्या विजया पेढांबकर, ग्रामसेवक व्ही. बी. गुरव, बँक सखी गौरी शिंदे आदी उपस्थित होते.


वैश्य नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गांगण
चिपळूण ः वैश्य नागरी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. या वेळेस पतसंस्थेच्या चेअरमनपदी जीवन गांगण तसेच व्हाइस चेअरमनपदी विभावरी गांधी यांची निवड करण्यात आली. या वेळी कोअर कमिटीच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ सूचय रेडीज, पंकज कोळवणकर, निहार गुढेकर, राधिका पाथरे आदी उपस्थित होते. या वेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच चेअरमन जीवन गांगण, व्हाईस चेअरमन विभा गांधी, संचालक हेमंत शिरगावकर, नयन साडविलकर, संदेश माजलेकर, संजय कुचेकर, प्रतीक रेडीज, तुषार रेडीज, सागर गांधी, प्रसाद साडविलकर, मनोज दळी, गीता चिंगळे, अरुण कांबळे, संस्थेचे सचिव यांचा सत्कार करण्यात आला.


06139
लॉ सीईटी परीक्षेत अर्णव कऱ्हाड यांचे सुयश
हर्णै ः महाराष्ट्र शासन-राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा सेल (मुंबई) यांनी घेतलेल्या ''लॉ सीईटी'' या परीक्षेस संपूर्ण देशातील एकूण ६४ हजार १४३ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये प्रियांका पाटील यांनी प्रथम क्रमांक, मनाली म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक तर अर्णव कऱ्हा‍ड यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. अर्णव कऱ्हाड हे दापोली येथील वराडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड व प्रा. सुवर्णा कऱ्हाड यांचे सुपुत्र आहेत. प्राचार्य डॉ. अनिल राव, प्रा. डॉ. शहाजी मिसाळ, प्रा. डॉ. बालाजी केंद्रे, ॲड. बाळासाहेब मुंढे, प्रेमनाथ केंद्रे, प्रा. सुरेश खरात, डॉ. जिभाऊ बच्छाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com