केशवसुतांच्या दापोलीतील वास्तूत रंगले ''काव्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवसुतांच्या दापोलीतील वास्तूत रंगले ''काव्य संमेलन
केशवसुतांच्या दापोलीतील वास्तूत रंगले ''काव्य संमेलन

केशवसुतांच्या दापोलीतील वास्तूत रंगले ''काव्य संमेलन

sakal_logo
By

केशवसुतांच्या वास्तूत रंगले ‘काव्य संमेलन’
जागरणचा पुढाकार ; शांत वातावरणात उपस्थित झाले मंत्रमुग्ध
दाभोळ, ता. ३१ः सुमारे १०० वर्षांपूर्वी ज्या घरामध्ये केशवसुतांचे वास्तव्य होते. ते आता पूर्णपणे दुर्लक्षित असून, घराचे फक्त काही अवशेष उरलेल्या जागेमध्ये आहेत. या ठिकाणी दापोलीतील कवींना एकत्र करून ''काव्य संमेलन'' आयोजित केले होते. संध्याकाळच्या शांत वातावरणात रंगलेल्या या कवी संमेलनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासाठी जागरण संस्था आणि मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतला.
मराठीतील आधुनिक कवितेचे जनक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्या कवी केशवसुतांचे घर इतकी वर्षे दुर्लक्षित आहे. ज्या संस्थांनी या कामात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहून सर्व प्रकारचे सहकार्य करू, असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केले.
केशवसुतांची ही वास्तू साहित्यिक आणि पर्यटक यांच्यासाठी एक प्रमुख वास्तू म्हणून उदयास आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावयास हवेत. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात दापोली अर्बन बँकेचा महत्वाचा सहभाग असेल, असे दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी जाहीर केले. दापोली दाभोळ मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर आत जंगलात ही वास्तू आहे. त्यामुळे याच्या विकासात अडचणी आल्या तरी शासकीय स्तरावरून शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आपण सर्व सहकार्य करू, असे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी सांगितले.
जागरण संस्थेचे मंगेश मोरे व पत्रकार परिषदेचे शैलेंद्र केळकर यांनी पुढाकार घेऊन दापोली, मंडणगड, खेड या तीन तालुक्यातील साहित्यिकांना एकत्र केले आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. केशवसुतांच्या दुर्लक्षित घराच्या प्रांगणात कवी संमेलन करण्याच्या कल्पनेला तिन्ही तालुक्यातील कवींनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी दापोलीचे गटविकास अधिकारी दिघे, शिर्दे गावचे सरपंच बळवंत केंबळे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, प्रा. उत्तम पाटील, राहुल मांडलिक, रेखा जेगरकल उपस्थित होते.