कामगारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न

कामगारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न

06188
सिंधुदुर्गनगरी : बांधकाम कामगार संघटना बैठकीला बोलताना आयुक्त संदेश आयरे. सोबत बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष भगवान साटम, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर आदी.

कामगारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न

संदेश आयरे; सिंधुदुर्गनगरीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्वाही

ओरोस, ता. ३१ ः जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे २०१९-२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाईन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसांत सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही साहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली.
जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार माहासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त आयरे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे कामगार अधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली. यावेळी बांधकम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवान साटम, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, जिल्हा संघटक ओमकार गुरव, जिल्हा सचिव सत्यविजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जयश्री मडवळ आदी उपस्थित होत्या. या बैठकीत २०१९-२० चे प्रस्ताव मंजूर करण्याबरोबरच कोविड-१९ आर्थिक मदत, अवजारे खरेदी करण्यासाठी ५,००० रुपये प्रलंबित आर्थिक मदत, ट्रेनिंग भत्ता ४,२०० रुपये आदी प्रलंबित अर्ज मंजुरीच्या दृष्टीने मंडळास माहिती आठ दिवसांत सादर करण्यात येईल, असे ठरले. तसेच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांमार्फत चुकीच्या त्रुटी काढून अर्ज नाकारण्यात येतात, याबाबत कर्मचाऱ्यांना समज देण्यात येईल व असे नाकारलेले अर्ज अपडेट करून मंजूर करण्यात येतील, असा निर्णय बैठकीत झाला.
---
इतरही काही मागण्या
यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी त्रुटी दुरुस्तीसाठी कामगारांना सात दिवसांची मुदत देण्यात येते, त्याऐवजी ९० दिवसांची मुदत देण्यात यावी. माध्यान्ह भोजन बंद करून कामगारांना थेट बँक खाती पैसे जमा करावेत, आदी मागण्या करून यासाठी मंडळ कार्यालय येथे एकत्रित पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोषाध्यक्ष ठाकूर यांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीत जे प्रश्न सुटलेले नाहीत, ते प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने सहाय्यक कामगार आयुक्त आयरे यांनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आणि उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सभा आयोजित करून तत्परता दाखविली, त्याबद्दल आभार मानले. याबाबतची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष साटम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com