चिपळूणच्या दसपटी विभागात जोरदार पाऊस

चिपळूणच्या दसपटी विभागात जोरदार पाऊस

दसपटी विभागात जोरदार पाऊस
चिपळूण, ता. ३१ः एकीकडे कडाक्याचा उष्मा सुरू असताना अशातच चिपळूणच्या दसपटी भागात मंगळवारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये कोणाचे नुकसान झाले नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मंगळवारी दसपटी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दसपटी भागातील पेढांबे, खडपोली, तिवरे, रिक्टोली, दादर, कळकवणे भागात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले होते. प्रथम रिमझिम पाऊस सुरू झाला होता नंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाली. वाऱ्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com