शाळीग्राम खातू यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

शाळीग्राम खातू यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

शाळीग्राम खातू यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार
श्री फाऊंडेशन सांगली; पंढरी किर्वे यांना सेवाश्री पुरस्कार
गुहागर, ता. ३० : तालुक्यातील खातू मसाले उद्योग समूहाचे मालक शाळीग्राम खातू यांना बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिषेक एन्टरप्रायईझेसचे मालक पंढरी जयराम किर्वे यांना उद्योग क्षेत्रातील विशेष सेवाश्री पुरस्कार २०२३ ने गौरविण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १ जून) सांगली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये सकाळ माध्यम समुहाच्या आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. या पुरस्काराबद्दल शाळीग्राम खातू यांचे अभिनंदन होत आहे. बिझनेस एक्स्प्रेस श्री फांऊडेशन वतीने उद्योग, सहकार, सामाजिक, क्रीडा या क्षेत्रातील कामगिरीसाठी विशेष सेवाश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये अभिषेक एन्टरप्राईझेस या विविध प्रकारची बटणे बनविणाऱ्या उद्योगाचे मालक पंढरी किर्वे यांचा समावेश आहे. पंचतारांकित हॉटेल तसेच फॅशनेबल कपड्यासाठी लागणारी विविध आकारांची बटणे वरवेली येथील किर्वे यांच्या कारखान्यात बनवली जातात. या उद्योगातून त्यांनी ३० हून अधिक स्थानिक महिलांना रोजगार दिला आहे.
संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना जीवन गौरव श्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये शाळीग्राम खातू यांचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीच्या मसाल्याबरोबरच अनेक प्रकारची पीठे उत्पादित करणारा खातू मसाले उद्योग आता महाराष्ट्रात पोचला आहे. उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा खातू परिवार गेली तीन वर्ष सातत्याने कॅन्सरवरील संशोधनासाठी व सैनिकांच्या संस्थेसाठी लाखमोलाची मदत करत आहे. कवितालेखन, खाद्यपदार्थ बनविणे अशा स्पर्धाही विनामूल्य आयोजित करुन ग्रामीण भागातील महिलांसाठी खातू मसाले उद्योगाने मोठे व्यासपीठ तयार केले आहे. सांगली येथे गुरुवारी (ता. १ जून) दुपारी २ वाजता डेक्कन मॅन्युफॅचरर्स असोसिएशनच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com