जिल्हा परिषदेत एकाच दिवशी
तब्बल 40 जण सेवानिवृत्त

जिल्हा परिषदेत एकाच दिवशी तब्बल 40 जण सेवानिवृत्त

जिल्हा परिषदेत एकाच दिवशी
तब्बल ४० जण निवृत्त
---
चार अधिकारीही; रिक्त पदांचा ताण येणार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१ ः मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे दुबळ्या बनलेल्या जिल्हा परिषदेतील तब्बल ४० अधिकारी, कर्मचारी आज निवृत्त झाले आहेत. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद प्रशासनातील विविध संवर्गांतील रिक्त पदे गेली अनेक वर्षे भरण्यात न आल्याने प्रशासकीय यंत्रणा दुबळी बनली आहे. त्यातच आज जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, उपशिक्षक, परिचर, वाहनचालक, आरोग्य कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असलेले तब्बल ४० कर्मचारी आज नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, गटविकास अधिकारी मोहन भोई, उपविभागीय जलसंधारण अधिकारी खंडू इल्हे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत चौलकर यांच्यासह शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, उपशिक्षक अशा पदांवर कार्यरत असलेले १९ कर्मचारी तसेच आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायिका अशा पदांवर कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे १० कर्मचारी व जिल्हा परिषदेचे वाहनचालक, हवालदार, परिचर पदांवर कार्यरत असलेले सात कर्मचारी असे मिळून एकूण ४० अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातील रिक्त पदांमध्ये मोठी भर पडली असून, प्रशासकीय यंत्रणा अधिकच दुबळी बनली आहे. आज निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com