आडकर, मुंबरकर यांना महिला सन्मान पुरस्कार

आडकर, मुंबरकर यांना
महिला सन्मान पुरस्कार

06230
सर्जेकोट मिर्याबांदा ः भारती आडकर, उषा पिंगुळकर यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

आडकर, मुंबरकर यांना
महिला सन्मान पुरस्कार
मालवण : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याच्यावतीने ग्रामपंचायत स्तरावर जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार भारती आडकर व उषा मुंबरकर यांना सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामपंचायत सरपंच नीलिमा परुळेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामसेविका साक्षी पिंगुळकर, वैशाली आडकर, लक्ष्मीकांत सावजी, आरती परुळेकर, सीमाली परब, दीक्षिता परब, यजितकुमार परुळेकर, श्रीदत्त परब, हर्षद जाधव आदी उपस्थित होते.
................
06229
कोळंब ः नेहा कोळंबकर, यशश्री चव्हाण यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोळंबकर, चव्हाणांना पुरस्कार
मालवण : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याने ग्रामपंचायतस्तरावर जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार नेहा कोळंबकर (रा. कोळंब) व यशश्री चव्हाण (रा. कातवड) यांना कोळंब सरपंच सीया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला. महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला.
................
विजेच्या लपंडावामुळे मालवणवासीय त्रस्त
आचरा : पावसाच्या वातावरणानेच आचरा गावात कालपासून (ता. ३०) विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांसोबत व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी बांधवांनी दिला आहे. आचरा भागात पाऊस पडला नसला तरी कालपासून अधूनमधून पावसाळी ढग दाटून येत पावसाळी वातावरण बनत आहे; मात्र पावसाळी वातावरणानेच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने पावसाळ्यात वीज समस्या आणखीन उग्र बनण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात असून विद्युत समस्या तातडीने दूर न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.
--
तलाठी पदभरतीसाठी मदत कक्ष
सिंधुदुर्गनगरी ः जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आस्‍थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांच्‍या अडचणी दूर करण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) स्‍थापन करण्‍यात आला आहे. महाराष्ट्रातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्रानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरून जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार आहे. तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या समस्या दूर करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यातबाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमिअभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com