हळवलमध्ये वीज पुरवठा खंडित

हळवलमध्ये वीज पुरवठा खंडित

06225
कणकवली : येथील महावितरण कार्यालयासमोर हळवल ग्रामस्थांनी आंदोलन केले.

हळवलमध्ये वीज पुरवठा खंडित

ग्रामस्थ आक्रमक; महावितरणचे अधिकारी धारेवर

कणकवली, ता.३१ : काल झालेल्‍या अवकाळी पावसानंतर हळवल गावचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्‍याने आक्रमक झालेल्‍या हळवल ग्रामस्थांनी कणकवलीतील महावितरण कार्यालयाला धडक देऊन आंदोलन सुरू केले. वीज पुरवठा सुरळीत झाल्‍याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्राही ग्रामस्थांनी घेतला आहे.
अवकाळी पावसामुळे काल (ता.३०) शहरातील बिजलीनगर येथे वृक्ष कोसळून वीज तारा तुटल्‍या होत्या. यानंतर संपूर्ण तालुक्‍याचा वीज पुरवठा बंद झाला; मात्र दोन तासानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला; परंतु हळवलचा वीज पुरवठा बंद राहिला. आज सायंकाळी सहापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्‍याने हळवलचे माजी उपसरपंच प्रदीप गावडे यांच्यासह प्रकाश पवार, प्रशांत गावडे, भरत गावडे, सुदर्शन राणे, मनोहर गावडे, मंगेश गावडे, सुभाष परब, विजय परब, संजय गावडे, दीपक परब, चंद्रकांत परब, रोहित राणे, कैलास परब आदींनी महावितरणला घेराओ घातला. त्‍यानंतर भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुशील सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदींनीही महावितरण कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महावितरणचे अभियंता विलास बगाडे आले. त्‍यांनी हळवल गावच्या लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला; मात्र त्‍या लाईनमनचा फोन बंद असल्‍याने ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर येथून हलणार नाही, असा पवित्रा हळवलवासीयांनी घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com