यवनिका...

यवनिका...

प्रवास दशावताराचा

swt19.jpg
06311
प्रा. वैभव खानोलकर
swt112.jpg
06307
दशावताराच्या रंगमंचावरील यवनिका.

यवनिका...

लीड
दशावतार हा अनादी काळापासून चालत आलेला याच मातीतला समृद्ध आविष्कार. वेगवेगळ्या परंपरा, रूढी जोपासत आजही हायटेक युगात सुध्दा दशावताराची आवड तशीच आहे, नव्हे तर ती अजूनही वाढताना दिसते. याचे कारण काळानुरूप दशावतार लोककलेत बदल झाला; पण अजूनही शतकानुशतकांच्या परंपरा दशावतार जोपासत राहिला आणि आजही त्या आपल्याला दिसतात. दशावतार हा या लाल मातीत कित्येक दशके वावरतोय आणि याचा पुरावा म्हणजे ‘यवनिका’ होय. गणपती येताना अथवा एखादी व्यक्तिरेखेचा जेव्हा रंगमंचावरील युध्दात वध वा शेवट केला जातो, यावेळी त्या वध झालेल्या कलावंताला रंगमंचावरून माघारी आणण्यासाठी दशावतारातील सहाय्यक कलावंत रंगमंचावर पडलेल्या कलावंतासमोर वा गणपती बाप्पा रंगमंचावर आणताना जो आडवा पडदा धरतात, त्यालाच ‘यवनिका’ असे म्हणतात.
- प्रा. वैभव खानोलकर
................
‘यवनिका’ हा शब्द संस्कृत भाषेतील असून हा शब्द भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात मिळतो. रंगमंच म्हणजे ज्या भूमीवर किंवा जागेवर प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो ती जागा. याला ‘रंगपीठ’ असे म्हणतात. रंगमंच विषयक कल्पना देशकालपरत्वे सतत बदलत गेल्याचे दिसते. नाटक, नाट्यगृह आणि रंगमंच यांचा निकटचा परस्परसंबंध आहे. भारतीय रंगमंचाची नाट्यगृहाची संकल्पना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात दिसते. रंगमंचाचे स्वरूप काय असावे, त्याची बांधणी कशी असावी, याविषयीचे तपशीलही भरतमुनींच्या ग्रंथात दिलेले आहेत.
दशावतार हा तसाच शतकानुशतके चालत असणारा प्राचीन लोककला प्रकार. आजच्या हायटेक युगात दशावताराची प्राचीन संस्कृती जोपासणाऱ्या या लोककलेत आजही यवनिका दिसते. यवनिका सांभाळणारा एक सहाय्यक कलावंत हा तितकाच महत्त्वाचा असतो. नाटकात नेमके कधी यवनिका घेऊन रंगमंचावर जायचे आहे, याबद्दल जबाबदारी या सहाय्यक कलावंताची असते. त्यामुळे त्याला नाटकातील प्रवेश माहीत करून घेणे गरजेचे असते. यासाठी संबंधित कलावंताकरवी नाटकाची संहिता हा सहाय्यक कलावंत माहिती करून घेतो व धयकाल्यात पूर्ण रात्रभर आणि नाटकासाठी बहुतांश ठिकाणी ट्रिकसिन नाटकातही ही यवनिका दिसते आणि दशावताराच्या प्राचीन संस्कृतीची ओळख पटते.
यवनिका घेऊन रंगमंचावर जाणाऱ्या कलावंताला नाटकांतील पात्राच्या प्रवेशाची माहिती असणे गरजेचे असते. एखाद्या मरणाच्या प्रसंगाबरोबरच सतीगमन प्रवेशासाठी सुध्दा पडदा लागतो. ‘अहि-महि रावण’ नाटकात सुध्दा गोंधळाच्या वेळी यवनिका लागते. अग्नीत प्रवेश करणे आदी गोष्टींसोबतच रंगमंचावर तलवार, यज्ञ सामग्री, पंचारती आदी गोष्टीही हाच सहाय्यक कलावंत म्हणजे यवनिका सांभाळणारा कलावंत रंगमंचावर पुरवत असतो. अर्थात यवनिका सांभाळणारा सहाय्यक कलावंत सुध्दा नाट्यप्रयोग पुढे नेण्यासाठी तितकाच जबाबदार आणि महत्त्वाचा असतो. रंगमंचावर दर्शनी पडद्याप्रमाणे स्थळदर्शनासाठी पुढे विविध पडद्यांची योजना करण्याची पद्धत काळानुरूप रूढ झाली.
ते पडदे लावण्यासाठी रंगमंचाच्या वरच्या बाजूस मंडपी बांधण्याची प्रथा सुरू झाली. तसेच रंगमंचाच्या दोन्ही बाजूंना पाखांचा (विंगा) उपयोग सर्रास सुरू झाला. नेपथ्य, प्रकाशयोजना यांच्या संदर्भाला जसजशी प्रगती होत गेली, तसतशी रंगमंचाची रूपेही बदलत गेली. तिन्ही बाजूंनी उघडा असलेला रंगमंच बंदिस्त झाला; पण दशावतार लोककला मात्र थोड्या प्रमाणात का असेना, अपवाद ठरली. प्राचीन परंपरा आजच्या हायटेक युगात अनुभवायची असेल तर नक्की भेट द्या दशावतार लोककलेच्या रंगमंचाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com