
राजेसाहेब राणे यांचा सावंतवाडी येथे सन्मान
swt122.jpg
M06372
सावंतवाडीः महसूल मंडळ अधिकारी राजेसाहेब राणे यांना आपल्या खुर्चीत बसवून तहसीलदार अरुण उंडे यांनी सन्मानित केले.
राजेसाहेब राणे यांचा
सावंतवाडी येथे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः येथील महसूल मंडळ अधिकारी राजेसाहेब राणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांनी त्यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सन्मानित केले. कनिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या खुर्चीत बसवून सन्मान दिलेल्या तहसीलदार उंडे यांचे कर्मचारी वर्गातून कौतुक होत आहे. अनपेक्षितपणे खुर्चीत बसविल्याने राणे यांना देखील गहिवरून आले.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार उंडे यांनी राणे यांचे महसूल क्षेत्रातील योगदान व अनुभव हा वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. राणे यांना आपल्या ३८ वर्षांच्या सेवेत तहसीलदारपदापर्यंत मजल मारली नाही; मात्र त्यांचा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. याच भावनेतून त्यांना काही क्षणांसाठी तहसीलदारपदाचा मान दिला, असे ते म्हणाले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांसमोर तहसीलदार उंडे यांनी राणे यांना आपल्या खुर्चीत बसण्याचा मान दिला. स्वतः तहसीलदार त्यांच्या बाजूला उभे राहिले. अचानक झालेल्या या सन्मानाने राणे देखील भारावून गेले. त्यांनी तहसीलदार उंडे यांच्या दिलदारपणाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.