
वेंगुर्लेत ''शिवराज्याभिषेक दिन'' साजरा
swt24.jpg
06487
वेंगुर्लेः भाजपच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा दिमाखात साजरा करण्यात आला.
वेंगुर्लेत ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा
भाजपचा उपक्रमः पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शिवरायांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः वेंगुर्ले भाजपच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष राजन गिरप व वसंत तांडेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन या दिवसाला हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी इतिहासात छत्रपती शिवरायांचा ‘न भूतो न भविष्यती’ असा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला. ही घटना इतिहासात सुवर्णाक्षरात कोरली गेली. या देदीप्यमान सोहळ्याला ३५० वर्षे झाली. म्हणूनच चालू वर्ष हे शासनातर्फे शिवराज्याभिषेक शक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवशाहीचा जागर करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनातर्फे केले आहेत.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी तिथीप्रमाणे आज शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा होत आहे. विशेष करून यावर्षीच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. या वेळेचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा तब्बल 350 वा ऐतिहासिक सोहळा असल्याने या सोहळ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
येथील माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, शहराध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळू प्रभू, युवा मोर्चाचे संदीप पाटील, नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, शक्तीकेंद्र प्रमुख शामसुंदर मुननकर, परबवाडा उपसरपंच पप्पू परब, बूथ अध्यक्ष रवींद्र शिरसाट व पुंडलिक हळदणकर, नितीश कुडतरकर, माजी सरपंच सूर्यकांत परब, ओंकार चव्हाण, दिलीप मालवणकर आदी उपस्थित होते.