
महिला कबड्डी स्पर्धेत अनिकेत स्पोर्टस विजेता
ratchl21.jpg-
06493
चिपळूणः स्पर्धेत झालेला विजयी संघ.
-------------
जिल्हास्तरीय महिला कबड्डी
स्पर्धेत अनिकेत स्पोर्टस विजेता
चिपळूण, ता. २ः येथील स्वराज्य स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने शहरातील अण्णासाहेब क्रीडा संकुलामध्ये आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा चुरशीच्या झाल्या. या स्पर्धेतील अंतिम अटीतटीच्या सामन्यात भरणे-खेड अनिकेत स्पोर्टससने चिपळूण स्वराज्य अ संघावर मात करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत स्पोर्टसची सिद्धी चाळके हिला सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील उपविजेता स्वराज्य अ - चिपळूण, तसेच उत्कृष्ट पकड- अनिकेत स्पोर्टसची सायली शिंदे, उत्कृष्ट चढाई- सारा शिंदे यांना गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक स्वराज्य स्पोर्टस् ''ब'', तर चतुर्थ क्रमांक राजापूरच्या शिवमुद्रा क्रीडा मंडळाने पटकावला. स्पर्धेचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. दीर्घ कालावधीनंतर शहरात खास महिलांसाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना गौरवण्यात आले. या वेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम, सदानंद जोशी, विकास पवार, राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा पवार-उदेग, ललिता घरट-वायंगणकर, राणी महाडीक, दीपमाला नाटुस्कर, न्यू हिंद विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार, निहार कोवळे, श्रद्धा हुंबरे, राखी सकपाळ, अंकिता पवार, ऋतुजा ढगळे, पायल रेडीज, श्वेता शिंदे, श्रद्धा पेंढारी आदी उपस्थित होते.