रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

बाबूजी आणि मी मैफल
रत्नागिरीत उद्या होणार
रत्नागिरी ः सांगलीतील १९१ वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीतर्फे ४ जूनला येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता ''बाबुजी आणि मी'' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबुजी श्रीधर फडके यांनी गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या सदाबहार आणि अजरामर गीतांचे सादरीकरण स्वतः श्रीधर फडके या कार्यक्रमात करणार आहेत. बाबुजी आणि मी या कार्यक्रमात ते ख्यातनाम गीतकारांच्या लेखणीतून अजरामर झालेली गीते सादर करणार आहेत. या सुश्राव्य कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीएनजीतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या विनामुल्य प्रवेशिका पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या येथील शाखेमध्ये उपलब्ध आहेत.

पाच महिन्यात ७५२ क्षयरोगी
रत्नागिरी ः क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्षयरोगांची माहिती गोळा केली जात आहे. जिल्ह्यात मागील पाच महिन्यात ७५२ क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. २०२२ या वर्षात ८७ जणांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. जिल्हा क्षयरोग विभागाकडून २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासकीय रुग्णालये व जिल्हा क्षयरोग विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. हे रुग्ण वेळवर वैद्यकीय उपचार न घेणे, फुफ्फुस संपूर्ण खराब झाल्यानंतर उशिरा डॉक्टरकडे जाणे, क्षयरोगी रुग्णाला इतरही आजार झालेले असणे आणि गरजेइतका पोषक आहार न घेणे या सारख्या विविध कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.


आरे समुद्र किनारी आग
रत्नागिरी ः शहरापासून जवळ असलेल्या आरे समुद्रकिनारी सुरूबनात गुरुवारी (ता. १) रात्री उशिरा अचानक मोठी आग लागली. झाडाच्या खाली मोठ्या प्रमाणात सुखा पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अनेक झाडांचे नुकसान झाले. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. आग लागल्याचे वनविभागाला कळविण्यात आले. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिस पाटील आदेश कदम, ग्रामपंचायत सदस्य आशिष कनगुटकर व त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com