‘मदर क्विन्स’चा निकाल १०० टक्के

‘मदर क्विन्स’चा निकाल १०० टक्के

06585
मानसी राऊळ, पुर्वा परुळेकर, पूजा सावंत

‘मदर क्विन्स’चा निकाल १०० टक्के
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १०० टक्के यश मिळवत १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. मानसी राऊळ हिने ९६.२० टक्के प्राप्त करुन प्रथम, व्दितीय संतोष परुळेकर (९४), तृतीय पूजा सावंत (९३.२०) यांनी क्रमांक पटकावला. उत्तीर्ण विदयार्थ्यापैकी ४१ विदयार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. सर्व यशस्वी विदयार्थ्याचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रध्दाराजे सावंत भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहायक संचालक अ‍ॅड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com