...तर संस्था विकास केंद्रे बनतील

...तर संस्था विकास केंद्रे बनतील

06548
सिंधुदुर्गनगरी ः कॉमन सर्विस सेंटर प्रशिक्षणाचे उद्‍घाटन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी उर्मिला यादव आदी.

...तर संस्था विकास केंद्रे बनतील

मनीष दळवी; सिंधुदुर्गनगरीत कॉमन सर्व्हिस सेंटर प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः आपल्या गावातील परिसरात अनेक शेतकरी, विद्यार्थी आहेत. हे सगळे लोक आपल्या विकास संस्थेबरोबर आल्यास विकास संस्थेचे अन्य व्यवहार वाढवण्यासाठीही आपल्याला एक संधी प्राप्त होईल. सगळ्या प्रकारची सेवा जर विकास संस्थेच्या कार्यालयांमध्ये दिली तर त्या गावचे एक विकासाचे केंद्रबिंदू म्हणून आपण विकास संस्था पुढे आणू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
जिल्हा बँक व जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील विकास संस्थाचे चेअरमन व सचिव यांच्यासाठी प्राथमिक शेती सहकारी संस्थांसाठी कॉमन सर्विस सेंटरबाबत प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीमधील सभागृहामध्ये आयोजित केला होता. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नाबार्ड प्रबंधक अजय थुटे, कॉमन सर्विस सेंटर जिल्हा समन्वयक सुयोग दीक्षित, हर्षद ढेकणे-कॉमन सर्विस सेंटर अधिकारी, सहाय्यक निबंधक अनिलकुमार खंडागळे, के. आर. धुळप, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक देवेंद्र लोकेगांवकर, संदेश हडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यांसाठी तर दुपारच्या सत्रात देवगड, कणकवली, वैभववाडी व मालवण या तालुक्यांसाठी घेण्यात आले.
---
चौकट
योजना केवळ महाराष्ट्रातच
श्री. दळवी म्हणाले, ‘‘शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान योजनेमुळे विकास संस्थांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ही योजना संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे. विकास संस्थाच्या ज्या काही समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी जिल्हा बँकेची यंत्रणा कायम आपल्या सोबत आहे. गावातल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देत असताना संस्थेचा नफा कशा पद्धतीने वाढेल याची अधिक काळजी आपण घेतली पाहिजे. हे करत असताना आपल्या संस्थेचा कर्ज व्यवहार एनपीएमध्ये येता नये, यासाठी कडक भूमीका घेण्याची तयारी संस्था पदाधिकारी म्हणून घेतली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com