रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

पान ५ साठी

वंदे भारत एक्स्प्रेस आज रत्नागिरीत
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी (ता. ३) मडगाव- मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव येथे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि दुपारी १.४० ला या गाडीचे रत्नागिरी स्थानकावर आगमन होईल. त्यावेळी रत्नागिरीकरांच्या वतीने या रेल्वेचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी दिली. वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील संपूर्ण देशी बनावटीची जलदगती आरामदायी ट्रेन आहे. आतापर्यंत या श्रेणीतील वीस गाड्या सुरू झाल्या आहेत. या वर्षअखेरपर्यंत ७५ गाड्या देशभरात सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक वंदेभारत हा प्रकल्प आहे. रेल्वे मंत्रालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात जलदगती ट्रेन सुरू होत आहेत. कोकण रेल्वेवर वंदेभारत सुरू झाल्याने रत्नागिरीतील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. याचा फायदा येथील पर्यटन व इतर व्यवसायांना होणार आहे. या ट्रेनच्या स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन वहाळकर यांनी केले आहे.

(टीप- जाहिरातदार आहे.)

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये
उद्या मोफत तपासणी शिबिर
रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर रविवारी ४ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. यात प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. शहरातील शिवाजी नगर येथील धन्वंतरी रुग्णालयात २०१४ मध्ये सुरू झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. तोरल शिंदे या दर महिन्याला मोफत तपासणी शिबिर घेतात. यात माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करणार आहेत. धन्वंतरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com