वंदे भारत पाणी घ्यायला थांबणार,मग थांबा का नको

वंदे भारत पाणी घ्यायला थांबणार,मग थांबा का नको

पान ५


चिपळूणचे पाणी चालते
मग थांबा का नको?
शौकत मुकादम; वंदे भारत स्टेशनवर थांबलीच पाहिजे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः वंदे भारत रेल्वे गाडीला खेडमध्ये थांबा देण्यात आलेला आहे, याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. कोकण रेल्वे तोट्यात प्रवाशांमुळे नसून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गामुळे आहे, असे आम्ही अनेक वेळा लक्षात आणून दिलेले आहे. रेल्वेचा तोटा भरुन काढायचा असेल तर चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत या गाडीला थांबा मिळाला पाहिजे, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली. याबाबत रेल्वेराज्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
वंदे भारत गाडीला चिपळूणमध्ये थांबा मिळाला पाहिजे. थांबा न दिल्यास पाणी भरणार कुठे. चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला जर ही गाडी थांबणार असेल तर प्रवासी घेण्यास हरकत काय. जर वंदे भारतला चिपळूण येथे थांबा दिला नाही, तर चिपळूण येथील पाणी बंद करावे लागेल. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांना १०० किमीच्या थांबे देण्यात आले आहेत. चिपळूणला थांबा देण्यात अडचण काय? तीन राज्यांना १०० किमीच्या आत प्रवासी वर्ग कमी असून देखील १३ थांबे देण्यात आले आहेत, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळवले आहे.
एका राज्यात एक निर्णय व दुसऱ्या राज्यात वेगळा निर्णय असे करून जनतेची दिशाभूल करू नये. रेल्वेचा होत असलेला तोटा प्रवासीच भरुन काढू शकतात, माल वाहतुकीच्या रेल्वे गाड्या व प्रवासी रेल्वे गाड्यांना चिपळूणमध्ये पाणी भरले जाते. प्रवाशांच्या रेल्वे गाड्यांमध्ये चिपळूण स्टेशनवर लाखो लिटर पाणी भरले जाते. एक महिन्याच्या आत वंदे भारत गाडीला चिपळूण येथे थांबा मिळणे अपेक्षित आहे. तसे आश्वासन वरिष्ठ अधिकारी यांनी दिले आहे. दिलेला शब्द पाळला नाही, तर चिपळूण येथील या रेल्वेला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com