सेवानिवृत्त प्रा. धर्मा कोळी यांना बेलोसे महाविद्यालयातर्फे निरोप

सेवानिवृत्त प्रा. धर्मा कोळी यांना बेलोसे महाविद्यालयातर्फे निरोप

rat३p१४.jpg
०६७२५
दापोलीः प्रा. धर्मा कोळी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना प्राचार्य कऱ्हाड.
-------------
सेवानिवृत्त प्रा. धर्मा कोळी यांना
बेलोसे महाविद्यालयातर्फे निरोप
दाभोळः दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ३२ वर्षे अर्थशास्त्राचे अध्यापन करणारे प्रा. धर्मा कोळी सेवानिवृत्त झाले. त्यांना महाविद्यालयातर्फे निरोप देण्यात आला. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्रा. धर्मा कोळी यांचे मोलाचे योगदान होते. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिक्षणाबरोबरच ग्रामीण समाजजीवन, बदलती परिस्थिती, समाजाची दशा व दिशा या विषयावर अनेकवेळा त्यांनी चर्चासत्र घडवून आणली. २०१० पासून ते अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, परीक्षा विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग त्यांनी सांभाळले होते. बाळशास्त्री जांभेकर शोधनिबंध, महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती, नेहरू युवा केंद्र रत्नागिरी या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता तसेच अनेक कथांचे राज्यस्तरीय पारितोषिकही त्यांना मिळाले होते. प्रा. कोळी यांनी काही काळ प्रभारी प्राचार्यपदही भूषवले होते तसेच उपप्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला होता.
-----------------
rat३p१५.jpg
06726
पालगडः मुख्याध्याक विश्वनाथ तांबडे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी.
------------
मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे सेवानिवृत्त
दाभोळ ः सानेगुरूजी एज्युकेशन सोसायटी संचलित पूज्य सानेगुरूजी विद्यामंदिर पालगडचे मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे हे (ता. ३४) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने त्यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता व सदिच्छा समारंभ संस्था, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांच्यावतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमात सानेगुरूजी एज्युकेशन सोसायटीचे चिटणीस डॉ. मकरंद करमरकर, प्रा. प्रभाकर पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते सानेगुरूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सानेगुरूजी संस्थेच्यावतीने मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे यांना गौरवण्यात आले. पालगड परिसरातील ग्रामस्थ, पालक, आजी-माजी विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक तांबडे यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी मुख्याध्यापक तांबडे यांचा सपत्नीक मुलांसमवेत सत्कार करण्यात आला. विज्ञानासारखा क्लिष्ट विषय मनोरंजक पद्धतीने सोपा करून शिकवण्याची तांबडे सरांची हातोटी विलक्षण होती. ३४ वर्षाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.
-----------------
पालगड हायस्कूलचा निकाल ९६.२९ टक्के
दाभोळः साने गुरूजींच्या जन्मभूमीतील ग्रामीण भागातील पालगड हायस्कूल या प्रशालेचा निकाल ९६.२९ टक्के लागला आहे. या प्रशालेतून ५४ विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले होते. त्यातील ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सुमित कोशिमकर ८४ टक्के (प्रथम), शुभम साळवी व वेदिका गायकवाड या दोघांनाही ८३.४० टक्के व स्नेहा भोसले व रिया घाडगे या दोघींनाही ८१.७ टक्के गुण मिळाले. सानेगुरूजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद केळकर व इतर पदाधिकारी तसेच प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे, मुख्याध्यापक प्रसाद पावसे यांनी अभिनंदन केले.
--------------
टाळसुरे विद्यालयाचा निकाल १०० टक्के
दाभोळः सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अॅंड ज्युनि. कॉलेज टाळसुरे या विद्यालयाचा बारावीप्रमाणेच दहावीचा निकालदेखील १०० टक्के लागला आहे. आयेशा शिंदे ८८ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, समीक्षा जागडे ८६.६० टक्के द्वितीय, प्रतीक्षा दवंडे ८६.४० टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या परीक्षेला ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य, २० विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा १६ वर्षे जपली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
------------------
आंजर्ले स्कूलमध्ये मोक्षा सांबरे प्रथम
दाभोळः आंजर्ले शिक्षणसंस्था संचलित एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्लेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. मोक्षा सांबरे हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम, कंगन चौधरी हिने ८८.४० टक्के द्वितीय तर तेजस करळकरने ८५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com