भरणेत मसाल्यच्या दुकानात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरणेत मसाल्यच्या दुकानात चोरी
भरणेत मसाल्यच्या दुकानात चोरी

भरणेत मसाल्यच्या दुकानात चोरी

sakal_logo
By

भरणेत मसाल्यच्या दुकानात चोरी
खेडः भरणेनाका (खेड) येथील मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याविरुद्ध खेड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ ते २ जून सकाळी नऊच्या सुमारास भरणेनाका, खेड येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे काळकाई माऊली उद्योगसमूह मालवणी मसाल्याच्या दुकानाच्या दर्शनी शटरला लावलेले कुलूप कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. दुकानातील लाकडी टेबलचे दोन्ही ड्रॉव्हर उचकटून स्टीलच्या डब्यातील २० हजार रुपयांची रोख रक्कमेची चोरी केली.
------
नागपूर स्पेशल एक्स्प्रेसमध्ये चोरी
रत्नागिरीः नागपूर स्पेशल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे चिपळूण रेल्वे स्टेशनदरम्यान रोख रक्कम व मोबाईल असा १७ हजाराचा ऐवज चोरट्याने पळवला. चिपळूण पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ मार्च २०२३ या कालावधीत चिपळूण रेल्वेस्टेशनदरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय पालसिंग राणा (वय ५७, रा. सेन्ट्रल इंटरग्रेड कास्ट मॅनेजमेन्ट सेंटर प्रोस्पर पार्क सिंगाडा तालाब, जि. नाशिक) हे नागपूर स्पेशल एक्स्प्रेसने प्रवास करत असताना चोरट्याने त्यांची बॅग चोरली. त्यामध्ये मोबाईल व रोख असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज होता.
-----
एटीएममध्ये विसरलेला मोबाईल चोरीस
रत्नागिरीः बाजारपूल येथील एसबीआयच्या एटीएम मशिनच्या कीपॅडवर अचूक ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवला. चोरट्याविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) सव्वानऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चुकून एटीएम मशिनच्या कीपॅडवर मोबाईल विसरल्या होत्या. ही घटना त्यांच्या लक्षात आल्यावर पुन्हा साडेनऊच्या सुमारास एटीएमजवळ गेल्या असता मोबाईल मिळून आला नाही. या प्रकरणी फिर्यादी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मोबाईल चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------

एसटी-मोटार अपघातात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

खेड ः दापोली ते खेड जाणाऱ्या रस्त्यावर कुवेघाटात एसटीने मोटारीला धडक दिली. या अपघातातील बसचालकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग राया कांबळे (वय ४५, रा. भरणेनाका-समाधान हॉटेलशेजारी, खेड ) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना १८ मे रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दापेली ते खेड रस्त्यावर कुवेघाट-खेड येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोटार (क्र. एमएच-०८ सी ७१८९) घेऊन दापोली ते खेड रस्त्याने रत्नागिरी येथे जात असताना खेड बाजूकडून येणारी एसटी (क्र. एमएच-१४ बीटी ०२७७) वरील चालक संशयित कांबळे यांनी धोकादायक स्थितीत एसटी चालवून मोटारीला समोरून धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचे पती ओंकार केळेकर, साहिल पोवार, अनुष्का संतोष झगडे, कृतिका झगडे व साई संदीप मालुसरे, साहिल पोवार यांना लहान-मोठी दुखापत झाली व दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----------