सावंत, तांबे, खोबरेकर विजयी

सावंत, तांबे, खोबरेकर विजयी

06843
सिंधुदुर्गनगरी : ग्रामसेवक पतसंस्था निवडणुकीत विजयी उमेदवार वैभव सावंत, नीतेश तांबे, उमेश खोबरेकर यांच्यासमवेत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर, जिल्हाध्यक्ष संतोष गावडे व अन्य.

सावंत, तांबे, खोबरेकर विजयी

ग्रामसेवक पतसंस्था निवडणूक; निकाल जाहीर; तीन पदांसाठी प्रक्रिया

ओरोस, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या तीन संचालकपदांसाठी आज मतदान झाले. त्यानंतर ताबडतोब मतमोजणी करण्यात आली. यात वैभव सावंत, नीतेश तांबे आणि उमेश खोबरेकर विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या १३ जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. यातील एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यामुळे १६ उमेदवार रिंगणात होते. १३ पैकी १० जागा बिनविरोध होत केवळ तीन जागांसाठी निवडणूक झाली. एकूण ३२१ मतदार निश्चित झाले होते. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील ग्रामसेवक भवन येथे मतदान प्रक्रिया राबविली गेली. ३२१ पैकी २६४ मतदारांनी मतदान केले. यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी झाली.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षांकरिता नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणूक पार पडली. श्रीकृष्ण मयेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. एकूण १३ संचालक निवडून द्यायचे होते. यात आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक, अनुसूचित जाती जमातीमधून एक, दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागास प्रतिनिधी, एक भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग असा समावेश आहे.
आठ तालुका मतदार संघातील वेंगुर्लेमधून सदाशिव अंधारी, दोडामार्ग-अमित दळवी, मालवण-युगलकिशोर प्रभुगावकर, देवगड-शमसुद्दिन साटविलकर, वैभववाडी-घनःश्याम नावळे, कणकवली-दत्तात्रय तळवडेकर, सावंतवाडी-प्रफुल्ल धुरी हे बिनविरोध निवडून आले. महिला संचालक दोन जागांसाठी मीनाक्षी पिळणकर आणि महानंदा वराडकर, इतर मागास प्रवर्ग एका जागेसाठी विवेक नर हे बिनविरोध निवडून आले; मात्र, कुडाळ तालुका मतदारसंघात वैभव सावंत (१५६, विजयी) आणि चेतना माणगावकर (१०८) यांच्यात, तर अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी मंगेश साळसकर (१००), नीतेश तांबे (१६३, विजयी) यांच्यात तसेच भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग या एका जागेसाठी नामदेव तांबे (१२४), उमेश खोबरेकर (१३५, विजयी) यांच्यात प्रत्यक्ष निवडणूक झाली. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी निकालानंतर जल्लोष केला. यावेळी एम. एस. धुमाळ, पी. एल. जाधव, पी. पी. साळगावकर, रघुनाथ म्हसकर, विलास सावंत यांनी निवडणूक कर्मचारी म्हणून काम पाहिले. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गावडे यांच्यासह पी. टी. पेडणेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com