‘वंदे भारत’ एक्स्प्रेस

‘वंदे भारत’ एक्स्प्रेस

‘वंदे भारत’ एक्स्प्रेस
उद्यापासून रुळावर
मडगाव (गोवा), ता. ३ : ओडिशात बालासोर येथे शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाल्यामुळे आज, शनिवारी मडगाव रेल्वे स्थानकावर होणारा ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रम जरी रद्द केला असला, तरी ही एक्स्प्रेस आता ५ जूनपासून मुंबई-मडगाव मार्गावर नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
५ जून रोजी सीएसटी मुंबई स्थानकावरून सकाळी ५.२५ वाजता ही गाडी सुटेल. या दुर्घटनेची बातमी थडकल्याबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी हा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करून लगेच ओडिशाला जायला निघाले. गेल्या आठ दिवसांपासून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे आठ डबे मडगाव स्थानकावर आणून ठेवले होते, मात्र दुर्घटनेची बातमी कळल्यानंतर शुभारंभाचा कार्यक्रम रद्द केल्याने ही गाडी शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. मडगाव स्थानकावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. गोव्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार आणि कोकण रेल्वेचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

चौकट
- रेल्वेचे वेळापत्रक
१. मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल.
२. मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.
३. मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल.
४. मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.
(शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सेवा)

चौकट
- प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com