मुख्यमंत्री शिंदे उद्या सावंतवाडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री शिंदे उद्या सावंतवाडीत
मुख्यमंत्री शिंदे उद्या सावंतवाडीत

मुख्यमंत्री शिंदे उद्या सावंतवाडीत

sakal_logo
By

06977
सावंतवाडी ः बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या कामाची पाहणी करताना शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर. शेजारी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, राजन पोकळे, बाबू कुडतरकर आदी.


मुख्यमंत्री शिंदे उद्या सावंतवाडीत

दीपक केसरकर ः विविध विकासकामांची भूमिपूजने

सावंतवाडी, ता. ४ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (ता.६) शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहेत. त्याचा आढावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्ताने येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सचिन वालावलकर, आबा केसरकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित केला आहे. कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यापुर्वी सकाळी दहाला येथील शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (कै.) रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेस गॅलरी व अन्य कामांची भूमिपूजन समारंभ एकाच ठिकाणी संत गाडगेबाबा भाजी मंडईमध्ये होणार आहे. दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय विश्रामगृह व बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री राणे, उद्योगमंत्री सामंत, पालकमंत्री चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.’’ यावेळी बैठकीनंतर बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या कामाची पाहणी करून अपुरे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले. मंगळवारी बॅरिस्टर नाथ पै सभागृह मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.