
शालेय दाखले वेळेत द्या
06978
कुडाळ ः प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार वैभव नाईक. शेजारी अमोल पाठक. (छायाचित्र ः अजय सावंत)
शालेय दाखले वेळेत द्या
वैभव नाईक; कुडाळात विविध कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः विद्यार्थ्यांना शालेय दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत द्या. क्रीडा संकुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या.
आमदार नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार अमोल पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या समवेत विविध विषयांवर बैठक झाली. येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना शालेय दाखले व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. प्रांताधिकारी काळूशे यांना वाढदिवसानिमित्त आमदार नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तहसीलदार अमोल पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, राजू गवंडे,गुरु गडकर आदी उपस्थित होते.