संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार

संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार

rat४p३३.jpg -KOP२३M०७०४१ राजापूर ः जवाहरचौकात असे पूराचे पाणी घुसले तर कृती आराखडा तयार करण्यात आला. (संग्रहित)


नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार
राजापूर नगर पालिका ; नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नगर पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला असून आपत्तीच्या काळामध्ये लोकांशी संपर्क साधण्यासह निर्माण झालेली आपत्ती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
अतिवृष्टी झाल्यास अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती असते. त्याच्यातून शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होते. बाजरपेठेसह शहरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा अनेक दिवस सलग कालावधीमध्ये वेढा पडलेला असतो. दरवर्षीच्या या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे शहरातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील गटारांची साफसफाई करताना पालिकेने संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये आपद्काळामध्ये लोकांना विविध स्वरूपाचे मदत करणार्‍या लोकांसह आपत्काळात करावयाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपत्काळात लोकांना सतर्क करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे भोंगा वाजविण्याचेही नियोजन करताना पूरस्थितीमध्ये अडकणार्‍या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. आपत्तीच्या काळामध्ये लोकांशी संपर्क साधण्यासह निर्माण झालेली आपत्ती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून त्यादृष्टीने अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या ड्युटीचे नियोजनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


चौकट
असा आहे आपत्ती आराखडा

चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू
अडकलेल्यांसाठी फायबर बोट सज्ज
आपत्ती व्यवस्थापनात २६ लोकांचा समावेश
नैसर्गिक आपत्तीचा संदेश देणारा भोंगा सज्ज
पूर कालावधीत स्थलांतरीत करणारी यंत्रणा


चौकट

आपत्काळात उपलब्ध सुविधा
नगर पालिका सुरक्षा बोट ः २
खाजगी सुरक्षा बोट ः २
जेसीबी ः २
पोहणार्‍या व्यक्ती ः ३४
लाईफ जॅकेट ः १०
पोहण्यासाठी गोल रिंग ः ७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com