रत्नागिरी शहरात 250 ठिकाणी बोअरवेल

रत्नागिरी शहरात 250 ठिकाणी बोअरवेल

फोटो ओळी
- rat४p३५.jpg- KOP२३M०७०४३ रत्नागिरी ः साळवी स्टॉप येथील स्वाती अपार्टमेंट येथून बोअरवेल मारण्याचे काम सुरू करताना राहूल पंडित, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, शिल्पा सुर्वे, पप्पू सुर्वे, सौरभ मलुष्टे, पूजा पवार, दिपक पवार, मनोज साळवी आदी.

रत्नागिरी शहरात २५० बोअरवेल खोदणार
पालकमंत्री सामंत ; आयसीआयसीआयचा सीएसआर फंड
रत्नागिरी, ता. ४ ः पालकमंत्री उदय सामंत व सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या सहकार्यातून आणि आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहरात सुमारे २५० ठिकाणी बोअरवेल प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या बोअरवेल मारण्याचे काम आजपासून सुरु झाले आहे. पुढील काळात रत्नागिरी शहरातील अन्य भागांमध्ये बोअरवेल मारण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. जिथे टँकरचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे, तिथे बोअरवेल मारण्यात येणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आयसीआय बँक यांच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी बोअरवेल मारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पालकमंत्री सामंत यांच्यापुढे मांडला होती. यावेळी काही गृहनिर्माण सोसायटींमध्ये बोअरवेलची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरातील नागरिकांना टँकरने पाणी देण्यापेक्षा बोअरचे पाणी कायमस्वरुपी होऊ शकते. शहरातील काही भागामंध्ये बोअरला चांगले पाणी लागते. काही गृहनिर्माण सोसायटींना सध्या बोअरचे पाणी उपयुक्त ठरत आहे. त्यासाठी येणारा खर्च सीएसआर फंडातून करण्याची संकल्पना पालकमंत्री सामंत यांनी लढवली. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक कुटूंबांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. याची सुरवात साळवी स्टॉप येथील स्वाती अपार्टमेंट येथून करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख राहूल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शिल्पा सुर्वे, पप्पू सुर्वे, सौरभ मलुष्टे, पूजा पवार, दिपक पवार, मनोज साळवी यांच्यासह अन्य नागरिक पस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com