झारापला आज ‘सती चंद्रसेना’

झारापला आज ‘सती चंद्रसेना’

झारापला आज ‘सती चंद्रसेना’
कुडाळ ः झाराप येथील भावई मित्रमंडळातर्फे उद्या (ता. ६) सायंकाळी सातला श्री देवी भावई मंदिरात संयुक्त दशावतार मंडळाचे ‘सती चंद्रसेना’ नाटक आयोजित करण्यात आले आहे. नामांकित दशावतारातील कलाकारांचा यात समावेश आहे. गणपती-संतोष राणे, रिद्धी सिद्धी-तेजस सोमण, रावण-महेश गवंडे, अहिरावण-नाना प्रभू, महिरावण- सदाशिव मोडक, चंद्रसेना-सुधीर तांडेल, राम-उदय राणे कोनसकर, लक्ष्मण-भरत नाईक, मारुती-दादा राणे कोनसकर, मकरध्वज-प्रथमेश खवणेकर, मगर-शिवप्रसाद मेस्त्री, गोंधळी-कृष्णा घाटकर, भ्रमर व गोंधळी-राजू हरयाण आदी कलाकार आहेत. हार्मोनियम अमोल मोचेमाडकर, पखवाज अर्जुन सावंत, ताल रक्षक नाथा काळसेकर यांची संगीत साथ आहे. विशेष सहाय्य तेंडोलकर दशावतार मंडळ, झाराप यांचे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
पेन्शनधारकांचा कणकवलीत सत्कार
कणकवली ः तालुका पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक कलमठ येथील पेन्शनर्स भवनमध्ये तालुकाध्यक्ष सीताराम तथा दादा कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत ७५ वर्षांवरील पेन्शनदारांचा सत्कार करण्यात आला. सभेला कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मनोहर आंबेकर, जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे चिंदरकर यांच्यासह सचिव विलास चव्हाण, उपाध्यक्ष मनोहर पालयेकर, कार्यकारिणी सदस्य अशोक राणे, भास्कर वंजारे, सुरेश पाटकर, अनंत घोणे, जी. एल. सावंत, एस. एस. पाटील, सुरेखा महाजन, सिद्धार्थ तांबे, मोहन सावंत, धाकू तानवडे, राजस रेगे, जे. जे. दळवी, श्रीमती देवरुखकर उपस्थित होते. मनोहर पालयेकर यांनी प्रास्ताविक केले. सखाराम सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------
भिरवंडेत शेतकऱ्यांना
भात बियाणे वाटप
कणकवली ः सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत यांच्यावतीने स्वखर्चाने दरवर्षीप्रमाणे भिरवंडे गांधीनगर येथील २५० शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे मोफत वाटप केले. भिरवंडे गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, मिलिंद बोभाटे, संतोष सावंत, विजय सावंत, विठ्ठल सावंत, आबा मराठे, मोतिराम सावंत, सुनील सावंत, श्रीकांत सावंत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------
नरडवे हायस्कूलचा निकाल १०० टक्के
कणकवली ः अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नरडवे इंग्लिश स्कूल, नरडवे प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल अडुळकर (९४.२०), वैदेही कांदळकर (८९.४०), हेमंत कदम व समृद्धी राणे (८८ टक्के) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com