ग्रामस्थ उतरले प्लास्टिक संकलनासाठी

ग्रामस्थ उतरले प्लास्टिक संकलनासाठी

rat५p३६.jpg
०७२९९
रत्नागिरीः प्लास्टिक कचरा गोळा करताना ग्रामस्थ.
rat५p३७.jpg
०७३००
महिलांनी संकलित केलेला प्लास्टिक कचरा.
----------
प्लास्टिक संकलनासाठी ग्रामस्थांचे श्रमदान
जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींत जिल्हा परिषदेचा उपक्रम; कचऱ्यावर होणार प्रक्रिया
रत्नागिरी, ता. ५ः जागतिक पर्यावरणदिनानिमित्त श्रमदान मोहिमेतून प्लास्टिक संकलन आणि स्वच्छता सोमवारी (ता. ५) जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाकडून राबवण्यात आली. ग्रामस्थ, महिला बचतगट, आशा, मदतनीस यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम ठिकठिकाणी यशस्वीपणे राबवली. संकलित केलेला प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी कंपन्यांना देण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणावर उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. तेथील जागांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक कचरा गोळा केल्यानंतर संबंधित जागेवर येथे कचरा टाकू नये, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे.
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये एकत्रित गोळा करण्यात आलेला प्लास्टिक कचरा तालुकास्तरावर जमा करून खडपोली एमआयडीसीतील अमर इंडस्ट्रिजला दोन दिवसांनी दिला जाणार आहे तसेच राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील प्लास्टिक कचरा पुनर्प्रक्रियेसाठी झाडगाव एमआयडीसीत पाठवण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तरुण मंडळ, महिला मंडळ, विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत मधील हद्दीतील साळवी स्टॉप येथे उघड्यावर कचरा असणाऱ्या जागेची स्वच्छता करण्यात आली. या प्लास्टिक स्वच्छता श्रमदान मोहिमेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत आवळे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, सरपंच ऋषिकेश भोंगले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com