खेड रेल्वेस्थानकात तरुणाचा मृतदेह

खेड रेल्वेस्थानकात तरुणाचा मृतदेह

खेड रेल्वेस्थानकात तरुणाचा मृतदेह
खेडः येथील रेल्वेस्थानकातील रुळावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत रेल्वेस्थानक प्रमुख अमर मुकादम यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणाचा मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील शवागरात ठेवला आहे. या अज्ञात तरुणाबाबत कोणाला माहिती असल्यास येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन येथील पोलिसांनी केले आहे.
--
मुलीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा
खेडः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय व्यंकट सुरवसे (रा. कोराळा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. लवेल, ता. खेड) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ३ मे रोजी सकाळी ९ ते १० या कालावधीमध्ये विजय याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com