खालापुरातील ऐतिहासिक 
पेठे तलाव गाळमुक्‍त

खालापुरातील ऐतिहासिक पेठे तलाव गाळमुक्‍त

खालापुरातील ऐतिहासिक
पेठे तलाव गाळमुक्‍त
खालापूर ता. ४ ः शहरातील चार एकर परिसरात पसरलेला विस्तीर्ण ऐतिहासिक पेठे तलावातील गाळ सफाईला सुरुवात झाली असून लोकसहभागातून गाळ काढण्यात आला. खालापूर शहराला तलावाचे श्रीमंती असून जवळपास १७ एकर परिसरात पसरलेला मसळे तलाव आणि खालापूर शहराचा सोमेश्वर सोसायटी परिसरात असलेला पेठे तलाव चार एकर परिसरात आहे. मसळे तलावाच्या साफसफाईचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
पेठे तलाव सोमेश्वर सोसायटीसाठी वरदान आहे. पेठे तलावालगत दोन विहिरी असून या विहिरीची पाणी पातळी तलावामुळे उन्हाळ्यातही टिकून असते. परंतु गेली आठ वर्षांपासून पेठे तलावातील गाळ काढण्यात न आल्यामुळे त्यात जलपर्णी तसेच गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी पेठे तलाव गाळमुक्त करण्यासाठी तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर नगरपंचायत त्याने पुढाकार घेतला. शनिवारी नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, नगरसेवक किशोर पवार आदींच्या उपस्थितीत तलाव सफाईला सुरुवात करण्यात आली. पेठेच्या तलावाची सफाई झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन सोमेश्वर सोसायटीतील पाणीटंचाईवर संपुष्टात येणार आहे. खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारी स्वच्छता मोहिमही सुरू करण्यात आली आहे. शहरातील गटारे, नाल्यातून गाळ व कचरा बाहेर काढून तो तसाच नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आठवडा उलटला तरीही गाठ तयार पडून आहे.
---
अखेर चौदा गावे
होणार टंचाईमुक्‍त
खालापूर, ता. ५ ः तालुक्यातील डोणवत धरणाने तळ गाठला असून भविष्यातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील यांच्या पुढाकाराने गाळ उपसा करण्यात येत आहे. खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागात डोणवत धरण आहे. खोपोली-पेण मार्गावरील असलेले हे धरण औद्योगिक वापराबरोबरच अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातील पाण्याचा वापर होतो. धरणाची संचय पातळी ६३.१५ मीटर म्‍हणजेच अंदाजे ३.२७० दशलक्ष घनमीटर असून पावसाळ्यात धरण पूर्ण भरते. कित्येक वर्षे धरणातील गाळ काढण्यात न आल्याने यंदा धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे चौदा गावांची पेयजल योजना बंद पडली होती. अखेरीस औद्योगिक पाणी उपसा पाटबंधारे विभागाने बंद केल्याने गावांचा पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला आहे. भविष्यात अशी परिस्थिती उद्भभवू नये, यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनुसार संदेश पाटील युवा मंचने स्वखर्चाने गाळ उपसा करण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com