रुग्णालयातील समस्यांवरून झाडाझडती

रुग्णालयातील समस्यांवरून झाडाझडती

rat६p१३.jpg
०७४३८
लांजा ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांना सूचना देताना पालकमंत्री उदय सामंत.
-------------
रुग्णालयातील समस्यांवरून झाडाझडती
लांजा, ता. ६ः लांजा ग्रामीण रुग्णालयात २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले ऑपरेशन थिएटर कुचकामी ठरत आहे, तर महिला रुग्णांसह सर्वच रुग्णांची ग्रामीण रुग्णालयात परवड होते. या महत्वाच्या प्रश्नावर लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी दिलेल्या बेजबाबदार उत्तरावरून पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची झाडाझडती घेतली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा येथील संकल्प सिद्धी सभागृहात सोमवारी (ता. ५) जूनला जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रांताधिकारी वैशाली माने, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत तसेच गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, लांजा तहसीलदार प्रमोद कदम आदी उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये निओशी येथील राहुल तांबे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष साठले यांनी केली. हा अपघात नसून तो घातपात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी. जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल, अशी मागणी त्यांनी केली. यावर सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक गायकवाड या तपास करतील आणि एका महिन्याच्या आत तुम्हाला त्याबाबतचा अहवाल सादर केला जाईल, अशा सूचना दिल्या. याबरोबरच लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या बेजबाबगार कारभाराबाबत सामंत यांनी डॉ. पाटील यांना फैलावर घेतले.
तसेच तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, तलाठी कार्यालयांची दुरवस्था व अन्य प्रश्नांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सामंत यांनी सर्वांना समर्पक उत्तरे देत त्यांचे प्रश्न त्या त्या वेळी मार्गी लागतील, असे ठोस आश्वासन दिले. यानंतर सामंत यांनी अधिकारीवर्गासह लांजा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com