राजापूर जिल्हा परिषद सेवक पतसंस्थेची रविवारी निवडणूक

राजापूर जिल्हा परिषद सेवक पतसंस्थेची रविवारी निवडणूक

rat६p२६.jpg
०७४६७
ताश्कंद तांबे
--------------
जिल्हा परिषद सेवक
पतसंस्थेची निवडणूक
राजापूर, ता. ६ ः रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पुरस्कृत सहकार पॅनेल उतरले आहे. या पॅनेलकडून राजापूर तालुक्याची पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक ताश्कंद तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
निवडणुकीसाठी रविवारी (ता. ११) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पुरस्कृत सहकार पॅनेलतर्फे संतोष गमरे, विकास बैकर, अरूणा वाघाटे, अनुष्का कुळकर्णी आणि समिक्षा तळेकर यांना जिल्हास्तरीय उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे, तर राजापूर तालुकास्तरीय उमेदवार म्हणून तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये महासंघासह समविचारी संघटनांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामध्ये कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांसह समविचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उमेदवारांसमवेत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. या प्रचार दौर्‍यामध्ये पंचायत समिती राजापूर अंतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्र धारतळे, जैतापूर, सोलगाव, ओणी पंचायत समितीअंतर्गत तालुकास्तरीय कार्यालयांना भेटी देऊन सर्व मतदारांना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पुरस्कृत सहकार पॅनेलमधील सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहन महासंघ पदाधिकारी आणि उमेदवारांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com