किल्ले हनुमंतगडावर
शिवराज्याभिषेक दिन

किल्ले हनुमंतगडावर शिवराज्याभिषेक दिन

फोटोसंक्षिप्त

टीपः swt७२८.jpg मध्ये फोटो आहे.

फुकेरी ः हनुमंत गड येथे वेशभूषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांसोबत उपस्थित मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

किल्ले हनुमंतगडावर
शिवराज्याभिषेक दिन
बांदा : सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले हनुमंतगड येथे शिवराज्याभिषेक दिनी आयोजित वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धकांनी विविध ऐतिहासिक वेशभूषा सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. या स्पर्धेत दीप सावंत (कुडाळ), सर्वज्ञ वराडकर (बांदा), नील बांदेकर (बांदा) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. विजेत्यांना हनुमंत गडाची प्रतिकृती व प्रमाणपत्र देण्यात आले. सकाळी ब्राह्मणांच्या साक्षीने फुकेरी ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या उपस्थितीत जल आणि दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गोव्यातील शिवव्याख्याते अॅड. शिवाजी देसाई यांनी शिवविचार मांडले. यावेळी कोल्हापूरचे प्रदीप भिंताडे, अलिबागचे ओंकार पाटील, बांदा केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अॅड. देसाई, भिंताडे यांनी केले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण गड व गडावरील शिवस्मारकाची फुलांची आरास करून आकर्षक सजावट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दुर्गसेवक सिद्धू परब यांनी केले. आभार दुर्गसेवक केदार देसाई यांनी मानले.

युवा सेनेतर्फे मंगळवारी
देवगडात विविध कार्यक्रम
देवगड : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील युवा सेनेच्यावतीने मंगळवारी (ता. १३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी दिली. यानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १४) रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गावकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com