63 अनधिकृत बांधकामांना नोटिसा

63 अनधिकृत बांधकामांना नोटिसा

swt८२६.jpg
०८२२८
कुडाळः पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष मंदार शिरसाट, आफ्रीन करोल, किरण शिंदे, उदय मांजरेकर आदी.

६३ अनधिकृत बांधकामांना नोटिसा
कुडाळ प्रभारी नगराध्यक्षः कचऱ्यापासून बायोगॅसचा प्रकल्प मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः कचरा निर्मूलनासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सुमारे २३ लाख निधीचा कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प मंजूर झाला आहे. कुडाळ ग्रामपंचायत ते नगरपंचायतीच्या आतापर्यंतच्या काळात शहरातील एकाही अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही; मात्र आता शहरात ६३ अनधिकृत बांधकामे निश्चित केली असून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने संबंधितांना नोटिस दिली आहे. अनिधिकृत बांधकामे न हटविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शहरातील नैसर्गिक जलस्रोताजवळ बांधकामे करून ते बदलणाऱ्या तिघांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, नगरसेविका श्रृती वर्दम, अक्षता खटावकर, ज्योती जळवी आदी उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले, ‘‘शहरात अनेक वर्षे कचरा प्रश्न गंभीर आहे. कचरा निर्मूलनासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सुमारे २३ लाख निधीचा कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प मंजूर झाला आहे. या संदर्भात काम करणाऱ्या भगिरथ प्रतिष्ठान तसेच इतर संस्थांशी चर्चा केली असून या प्रकल्पांतर्गत शहरात दरदिवशी कचऱ्यापासून दोन टन बायोगॅस निर्माण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी शहरात जागा मिळाली की तत्काळ तो राबविला जाईल. नगरपंचायतीला अग्निशमन बंब मिळाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील एकूण १९ ठिकाणी लागलेली आग या बंबाच्या साहाय्याने आटोक्यात आणली. यावेळी शहरवासीयांना बंब मोफत उपलब्ध करून दिला. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे; मात्र आम्ही केलेल्या योग्य नियोजनामुळे कुडाळ शहरात पाणीटंचाई नाही. मच्छीमार्केटसाठी दोन कोटी निधी आला आहे; मात्र भूसंपादन व जमीन हस्तांतरण झाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल. शहरातील स्मशानभूमीतील अपुऱ्या सोयी सुविधा पूर्ण करण्याकरिता खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून खासदार अनिल देसाई यांच्याकडे २५ लाख रुपये निधीची मागणी केली आहे. शहरातील मुख्य नळपाणी पाईप लाईन गेली ४० वर्षे बदलली नाही, त्यामुळे नळपाणी पाईन लाईन नवीन करण्यासाठी १ कोटी निधी मंजूर असून हॉटेल अभिमन्यू ते जिजामाता येथील पाईप लाईन नवीन करणे व दुतर्फा गटार बांधण्यात येणार आहे.’’

चौकट
प्रशासनाकडून सहकार्य नाहीः करोल
माजी नगराध्यक्ष करोल म्हणाल्या, ‘‘शहरातील वाहतूक कोंडी प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नाही. याबाबत पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. शहरातील मॉन्सूनपूर्व गटारे, नालेसफाईची कामे ९० टक्के पूर्ण केली आहेत. नगरपंचायतीला आतापर्यंत प्रथम ४ कोटी ६० लाख व आता ४ कोटी ७६ लाख असा निधी आला असून २ कोटी ६० लाखाच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com