शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षकांची रिक्त पदे भरा

शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षकांची रिक्त पदे भरा

swt९१८.jpg
08413
मालवणः शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपने उपलब्ध शिक्षक व रिक्त जागांबाबत गटशिक्षणाधिकारी माने यांच्याकडून माहिती घेतली.

शाळांमध्ये पटसंख्येनुसार
शिक्षकांची रिक्त पदे भरा
भाजपची मागणीः मालवणात आढावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शाळांचा आढावा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. रिक्त शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
आंतरजिल्हा व नियमित बदली प्रक्रियेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही शिक्षक बदली प्रक्रियेतून मालवणात नियुक्त झाले आहेत. नवीन भरती प्रक्रियेनंतर लवकरच अधिक संख्येने शिक्षक जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत २५ शाळा शून्य शिक्षकी दिसत आहेत; मात्र १५ जूनपासून सर्व शाळांत सर्वसाधारणपणे पटसंख्येचा विचार करून बदली होऊन आलेल्या व उपलब्ध शिक्षकांमधून शिक्षक नियुक्त झाले पाहिजेत. याबाबतचे नियोजन शिक्षण विभागाने करावे. गावातील ग्रामस्थ, पालक यांच्या मागण्यांचा विचार प्राधान्याने व्हावा, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी माने यांना सांगितले. येथील पंचायत समितीत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित आदी उपस्थित होते. रिक्त पदे व अन्य प्रश्न सोडवण्याबाबत माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com